आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

शूटिंग अपडेट:‘स्वामिनी’ मालिकेमध्ये मोठ्या रमेच्या पावलांनी उजळणार शनिवारवाडा, मालिकेच्या चित्रीकरणास सुरुवात 

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ‘स्वामिनी’ मालिका 21 जुलैपासून सोम ते शनि रात्री 8.30 वाजता प्रेक्षकांना बघता येणार आहे.

छोट्या पडद्यावरील 'स्वामिनी' मालिकेच्या चित्रीकरणाला आता सुरुवात झाली आहे. मालिकेच्या चित्रीकरणा दरम्यान सरकारने आखून दिलेल्या नियमांचे पालन करत आणि योग्य ती काळजी घेत मालिकेच्या सेटवर चित्रीकरणाला सुरुवात झाली. शूटिंगला सुरुवात होण्याआधी जवळपासचा परिसर, मेकअप रूम्स, सेटचे सॅनिटाईझेशन करण्यात आले. 21 जुलैपासून मालिकेचे नवे भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. 

येत्या भागांमध्ये प्रेक्षकांसाठी एक खास सरप्राईझ असणार आहे. निरागसपणे वाड्यात बागडत, हसण्याने सार्‍यांना मोहात पाडात, आणि पेशवाई संस्कारात घडत आपल्या रमाबाई मोठ्या झाल्या आहेत. हीच बालपणाची शिकवण घेऊन रमाबाई मोठेपणाची वाट चालणार आहेत. मोठ्या रमेच्या पावलांनी आता शनिवारवाडा उजळणार आहे. मोठ्या रमाबाईंची भूमिका कोण साकारणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.  

रमा एका सामान्य घरात वाढलेली निरागस मुलगी जिच्या नशिबी पेशवीणबाई होण्याचे थोर भाग्य आले आता ती भावी काळात येणार्‍या जबाबदार्‍या कशी पार पडेल ? माधवराव आईच्या विरोधात जाऊन तिला कशी साथ देतील ? रमा - माधव यांची नावे सुवर्णाक्षरांनी इतिहासाच्या पानावर कोरली गेली. माधवरावांचे रमावर असलेले अपार प्रेम, रमाबाईंनी केलेला त्याग याला पेशवाई साक्ष आहे. हे सगळे कसे घडले ? रमा – माधव यांचा हा प्रवास कसा होता ? त्यांना कोणाची साथ लाभली ?  हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे.