आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

छोटा पडदा:मराठ्यांच्या इतिहासातलं चित्तथरारक पान, अफझल खान वध!, 'या' दिवशी बघा ‘स्वराज्यजननी जिजामाता’ मालिकेचा अफझल खान वधाचा विशेष भाग

12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • विशेष भाग छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिवशी म्हणजे शुक्रवार 19 फेब्रुवारीला प्रसारित होणार आहे.

महाराष्ट्राचा जाज्वल्य इतिहास छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्यगाथांनी अत्यंत समृद्ध झाला आहे. उत्कृष्ट नायक, उत्तम संघटक आणि पराक्रमी योद्धा म्हणून त्यांनी आजवर अनेक यशस्वी मोहिमा फत्ते केल्या आहेत. त्यांच्या अनेक शौर्यकथांपैकी एक ज्यातून महाराजांच्या शौर्याची आणि कुशाग्र बुद्धिमत्तेची झलक पहायला मिळते ती म्हणजे अफझल खानाचा वध. ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या लोकप्रिय मालिकेत ही रोमहर्षक मोहिम आता पहायला मिळणार आहे.

शत्रूचे कपट, गुप्त कारस्थानांपुढे छत्रपती शिवाजी महाराज कधीच डगमगले नाहीत. संकटाच्या वेळी कल्पकता वापरून सहीसलामत बाहेर पडणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची धैर्यवान बाजू त्यांच्या सगळ्या मोहिमांमधून आपणास दिसून येते. अफझल खान वधाचे संपूर्ण नियोजन करताना शिवाजी महाराजांनी कशाकशाचा वापर केला, कशाप्रकारे आखणी केली या सगळ्या गोष्टींचा उलगडा करणारा विशेष भाग छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिवशी म्हणजे शुक्रवार 19 फेब्रुवारीला ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या मालिकेत रात्रौ साडे आठ वाजता पहायला मिळणार आहे.

अफझल खानाचा वध प्रतापगडाच्या पायथ्याशी करून आणि हिंदवी स्वराज्यावर आलेले संकट छत्रपती शिवाजी महाराजांनी परतवून लावले. खानाचा वध हा आदिलशाहीला बसलेला सर्वात मोठा प्रहार मानला जातो. छत्रपती शिवरायांच्या आयुष्यातील अत्यंत जोखमीची आणि तितकीच रोमहर्षक कामगिरी नेमकी कशी फत्ते झाली या मालिकेत अवश्य पहा.

बातम्या आणखी आहेत...