आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मराठी मालिकेचे महाराष्ट्राबाहेर चित्रीकरण:'तू सौभाग्यवती हो' या मालिकेचे चित्रीकरण गोव्यात सुरू, नवीन भाग बघायला मिळणार

7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'तू सौभाग्यवती हो' ही मालिका सोमवार ते शनिवार संध्या. 7 वाजता सोनी मराठी वाहिनीवर प्रसारित होते.

देशावर कोरोनाचे संकट असताना सुरक्षिततेसाठी राज्यात लॉकडाऊन करण्यात आला. त्यामुळे राज्यातील चित्रीकरणदेखील बंद करण्यात आले. एप्रिल महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीस आलेली सोनी मराठी वाहिनीवरील नवी मालिका 'तू सौभाग्यवती हो' थोड्याच काळात प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. साधी, गावातली ऐश्वर्या आणि त्याच गावतले प्रस्थ असलेला सूर्यभान यांची ही गोष्ट आहे. ऐश्वर्या जाधवांची सून कशी होणार आहे आणि त्यापुढे कायकाय घडणार आहे, हे सर्व प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

राज्यातील चित्रीकरणावर बंदी आल्यामुळे मालिकांचं चित्रीकरण थांबलं, पण 'तू सौभाग्यवती हो' या मालिकेचे नवे भाग प्रेक्षकांना आत्तापर्यंत पाहायला मिळाले आणि सिनेसृष्टीत 'शो मस्ट गो ऑन' असे म्हटले जाते, त्याप्रमाणे हे मनोरंजन असेच अखंडित सुरू राहणार आहे. मनवा नाईकच्या स्ट्रॉबेरी प्रोडक्शन या संस्थेची निर्मिती असलेली मालिका 'तू सौभाग्यवती हो'चा चमू आता गोव्याला पोचला असून मालिकेच्या पुढील भागांचे चित्रीकरण गोव्यात होईल.

या मालिकेतून अभिनेता शशांक केतकरची धाकटी बहीण दीक्षा केतकर हिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले आहे. दीक्षाची ही पहिलीच मालिका आहे. दीक्षाबरोबरच या मालिकेमध्ये हरीश दुधाडे, ज्योती चांदेकर, रोहित फाळके, गुरु दिवेकर आणि प्रिया करमरकर हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...