आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अचिव्हमेंट:अवघ्या 50 एपिसोडमध्येच ‘तुझं माझं जमतंय’ मालिकेने पटकावले अव्वल स्थान

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 50 भागांतच या मालिकेने झी युवावर अव्वल 50 भागांत प्रथम क्रमांक मिळवला आहे.

अभिनेता-निर्माता स्वप्निल मुनोत यांनी मनोरंजनसृष्टीत पुन्हा एकदा आपला ठसा उमटवला आहे. त्यांची झी युवा वरील 'तुझं माझं जमतंय'ही मालिका अगदी पहिल्या दिवसापासून चर्चेत राहिली आहे. नुकतेच या मालिकेने 50 एपिसोड पूर्ण केले असून केवळ 50 भागांतच या मालिकेने झी युवावर अव्वल 50 भागांत प्रथम क्रमांक मिळवला आहे. स्वप्निल आणि त्यांच्या टीमने 50 व्या भागांच्या यशाचे सेलिब्रेशन करून सर्वांची मेहनत आणि आनंद साजरा केला.

'तुझं माझं जमतंय' ही हलकी- फुलकी, दिलदार रोमँटिक कॉमेडी मालिका आहे. ही रॉमकॉम जॉनरची मालिका अश्विनी आणि शुभंकर यांच्या प्रेमकथे भोवती फिरत आहे. यामध्ये रोशन विचारे आणि मोनिका बागुल यांच्या प्रमुख भूमिका आहेत, तर अपूर्वा नेमळेकर यामध्ये 'पम्मी' नावाची सुंदर आणि दिलखेचक भूमिका साकारतेय. प्रेक्षक देखील या मनोरंजक कथानक असलेल्या मालिकेचा मनसोक्त आनंद घेत आहेत. एक अन एक एपिसोड प्रेक्षकांना स्वतःच्या प्रेमात पाडत आहे. फारच कमी वेळेत ही मालिका अनेकांची फेवरेट बनली.

निर्माते स्वप्निल मुनोत यांनी त्यांच्या दृष्टीकोनातून आणि मेहनतीने, प्रेक्षकांची आवड लक्षात घेऊन एक सुपरहिट शो बनवला आहे. त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले की त्यांच्यासाठी "स्काय इज दी लिमिट", प्रयत्न करत रहा, मेहनत करण्याची तयारी ठेवा आणि स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द ठेवा. याच त्यांच्या विचारसरणीमुळे स्वप्निल मुनोत यांनी नेहमीच नवनवीन गोष्टी अनुभवणे आणि अनुभवायला देणे या गोष्टीवर विश्वास ठेवला आहे.

बातम्या आणखी आहेत...