आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारोज एका विशिष्ट वेळेत प्रेक्षकांच्या घराघरांत पोहोचणाऱ्या मालिका या प्रेक्षकांसोबत एक अनोखं नातं जोडत असतात. मालिकांचा एकापेक्षा एक सुंदर एपिसोड तयार होतो, त्यांचे अनेक भाग यशस्वीपणे पूर्ण होतात या मागचे कारण कलाकार - तंत्रज्ञान यांची मेहनत आहेच पण प्रेक्षकांचा मालिकेवर असणारा विश्वास याचा देखील मोलाचा वाटा आहे. याच प्रेमाच्या सोबतीने आणि प्रेक्षकांच्या विश्वासाने झी युवा वरील 'तुझं माझं जमतंय' या मजेशीर आणि मनोरंजक मालिकेने नुकतेच 100 एपिसोड्स पूर्ण केले आहेत.
'तुझं माझं जमतंय' या मालिकेत सनई चौघडे वाजू लागले आहेत. म्हणजेच या मालिकेत लवकरच इंटरेस्टिंग भाग पाहायला मिळणार आहे कारण आशू आणि शुभंकर यांचे शुभ मंगल होणार असून त्यांच्या लग्नासाठी खुद्द पम्मीने पुढाकार घेतला आहे. आता पम्मी यांचं लग्न लावून देणार म्हणजे इंटरेस्टिंग गोष्ट आपसूक आलीच. हे नवीन भाग देखील प्रेक्षकांना कथेशी आणि मालिकेची जोडून ठेवतील यात शंका मुळीच नाही.
या मालिकेच्या स्पेशल एपिसोड्सच्या निमित्ताने पहिल्यांदा संपूर्ण शूटिंग हे नगर मध्ये झाले आहे. अहमदनगर फिल्म कंपनी आणि उद्योजक, चित्रपट निर्माते नरेंद्र फिरोदिया यांना आदर्श मानणारे निर्माते स्वप्निल मुनोत यांनी प्रेक्षकांना नक्की काय पाहायला आवडेल याकडे विशेष लक्ष देतात आणि प्रेक्षकांची आवड निवड लक्षात ठेवूनच मालिकेचा विचार केला जातो.
सध्या कोरोनाचे दिवस आहेत त्यामुळे अती काळजी घेणे गरजेचे आहे आणि या मालिकेच्या सेटवर प्रत्येक जण योग्य ती काळजी घेतोय. अशा परिस्थितीत काय हवं असतं तर एकमेकांची साथ... जर एकी असेल तर काम हे जास्त चांगल्या पद्धतीने पूर्ण होतं अशीच एकी 'तुझं माझं जमतंय'च्या टीममध्ये आहे. असं निर्माते स्वप्निल मुनोत यांनी सांगितले.
पडद्यावरील चेहरे, कलाकार रोशन विचारे, मोनिका बागुल, प्रतीक्षा जाधव आदी आणि पडद्यामागचे कलाकार म्हणजेच टेक्निकल टीम EP प्रविण चंदनशिवे, क्रिएटिव्ह हेड विराज मुनोत, संगीत डिपार्टमेंट मधील प्रमुख अभिजित पेंढारकर, दिग्दर्शक मंदार कुलकर्णी, प्रोजेक्ट हेड प्रणित मेढे, प्रोडक्शन कंट्रोलरची टीम अंकुश काळे, राकेश डोंगरे, गगन शिंदे या सर्वांचा या मालिकेच्या यशामध्ये महत्त्वाचा वाटा आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.