आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तुझं माझं जमतंय:आशु आणि शुभूच्या मैत्रीला आशूच्या आईचा नकार, पम्मीच्या प्रयत्नांना यश येणार का!

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आशु आणि शुभंकरची मैत्री टिकणार का?

'तुझं माझं जमतंय' ही मालिका नुकतीच झी युवा वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीस आली आणि सुरुवाती पासूनच या मालिकेने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. अपूर्वा नेमळेकरने या मालिकेतून टीव्ही माध्यमात पुनरागमन केलं त्यामुळे तिला पुन्हा एकदा टीव्हीवर पाहायला मिळतंय याचा आनंद प्रेक्षकांना आहे. अपूर्वा सोबतच रोशन विचारे आणि मोनिका बागुल या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत. या मालिकेचं शूटिंग नगरमध्ये चालू आहे.

सध्या मालिकेत प्रेक्षकांनी पाहिलं की, पम्मी आशु आणि शुभंकरची मैत्री घडवून आणण्यासाठी प्रयत्न करतेय. आशूला चक्कर येऊन ती पडते तेव्हा पम्मीच्या सांगण्यावरून शुभंकर आशूला मदत करायला जातो आणि तिला पाथर्डीला सोडायला जातो. एकीकडे त्या दोघांची मैत्री होते, पण नगरकरबाई शुभंकरला अट घालतात की इथून पुढे अश्विनीशी काहीही संबंध ठेवायचा नाही. अशा वेळी पम्मी त्या दोघांना एकत्र आणण्यासाठी पुढे काय करणार? आशु आणि शुभंकरची मैत्री टिकणार का? हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser