आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रक्षाबंधन स्पेशल एपिसोड:‘वैजू नंबर वन’मध्ये चोरालाच भाऊ मानत वैजू मागणार चोरी न करण्याची ओवाळणी

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • स्टार प्रवाहवरील ‘वैजू नंबर वन’ मालिकेचा रक्षाबंधन विशेष भाग

छोट्या पडद्यावरील ‘वैजू नंबर वन’ या मालिकेत रक्षाबंधन विशेष भाग पहायला मिळणार आहे. प्रत्येक प्रॉब्लेमला हटके सोल्यूशन शोधणाऱ्या वैजूला मालिकेत भाऊ नाही. रक्षाबंधनाच्या दिवशी तिला याची उणीव भासत असते आणि ती देवाला मला भाऊ मिळावा अशी प्रार्थना करते. योगायोगाने रक्षाबंधनाच्या दिवशी वैजूच्या घरात एक चोर घुसतो आणि देवाने कौल दिला या आनंदात वैजू या चोरालाच आपला भाऊ मानून त्याला ओवाळते. तिसरी मंझिलच्या चाळकऱ्यांच्या लक्षात जेव्हा ही गोष्ट येते तेव्हा नेमका काय गोंधळ उडतो आणि वैजू यातून कसा मार्ग काढते याची मजेशीर गोष्ट ‘वैजू नंबर वन’च्या रक्षाबंधन विशेष भागात पाहायला मिळणार आहे.

‘वैजू नंबर वन’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सध्याच्या तणावाच्या या वातावरणात मालिकेतले हलकेफुलके विनोद प्रेक्षकांची भरभरुन दाद मिळवत आहेत. तिसरी मंझिल चाळीतलं प्रत्येक पात्र प्रेक्षकांना आपलसं वाटू लागलं आहे. त्यामुळेच ‘वैजू नंबर वन’च्या प्रत्येक भागात कोणती नवी धमाल घडणार याची उत्सुकता असते.

बातम्या आणखी आहेत...