आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स'च्या निमित्ताने...:मराठी  कलाकारांनी सोशल मीडियावर शेअर केले बालपणीचे फोटो, सांगितलं त्यांचं छोटेपणीचं मोठं स्वप्न

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जवळपास 12 वर्षांनी 'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स' पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

झी मराठी वाहिनीवर 'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स' हा कार्यक्रम परत येतोय. 12 वर्षांपूर्वी 'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स'च्या महाअंतिम फेरीत पोहोचलेली पंचरत्न म्हणजेच रोहित राऊत, कार्तिकी गायकवाड, मुग्धा वंशयपायन, प्रथमेश लघाटे, आर्या आंबेकर यांनी प्रेक्षकांची मन तर जिंकलीच पण या कार्यक्रमाने या पंचरत्नांना संगीत क्षेत्रात उतरण्यासाठी तयार केलं आणि त्यांची एक वेगळी ओळख निर्माण केली. झी मराठीवर गाजलेल्या मालिकांची शीर्षक गीत गाण्याची संधी या पंचरत्नांना मिळाली. या पंचरत्नांनी मनोरंजन सृष्टीत नावलौकिकता मिळवली.

आता नवीन पिढीतून काही उमदा गायक गायकांना घडवण्याचा वारसा जपत जवळपास 12 वर्षांनी 'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स' पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमाची झलक वाहिनीवर पाहिल्यानंतर लिटिल चॅम्प्सच्या नवीन पर्वाची चर्चा घराघरात सुरु झाली. यावेळी स्पर्धेत जजेस नसून ज्युरी असणार आहेत, हे ज्युरी दुसरे कोणी नसून आपले ‘पंचरत्न’ असणार आहेत, हे ज्युरी आपल्या छोट्या स्पर्धकांचे मोठं स्वप्न साकारण्यासाठी मार्गदर्शन करणार आहेत. यासोबतच या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ‘मृण्मयी देशपांडे’ करणार आहे.

ह्या पर्वाचे नावीन्य म्हणजे ह्या पर्वात कोणतही एलिमिनेशन होणार नाही, छोट्या स्पर्धकांवर स्पर्धेतून बाहेर पडण्याचं कोणतंही दडपण नसेल. हो पण एलिमिनेशन नसलं तरी या गायक मित्र मैत्रिणींना आपलं गाणं रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मेहनत घ्यावीच लागणार आहे. म्हणजेच ह्या 14 छोट्या स्पर्धकांचा महाअंतिम सोहोळ्यापर्यंतचा प्रवास अनोखा असणार हे नक्की, सा रे ग म प लिटिल चॅम्प्स हा कदाचित मराठीतला एकमेव रिऍलिटी शो असेल ज्यात एकही स्पर्धक महाअंतिम सोहोळ्यापर्यंत स्पर्धेबाहेर जाणार नाही.

महाराष्ट्रातील उत्तोमत्तम गायक शोध हा कार्यक्रम घेतो त्यामुंळे लहानग्या गायकांसाठी सा रे ग म प पुन्हा एकदा नवी उमेद घेऊन आलं आहे. ही बच्चेकंपनी पुढे संगीतक्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करतीलच, ही ओळख आणि लिटिल चॅम्प्सचं मोठं स्वप्न साकारण्यासाठी झी मराठी आणि सारेगमपचा मंच सज्ज आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने झी मराठीवरील प्रेक्षकांच्या लाडक्या कलाकारांनी देखील आपल्या लहानपणीचे फोटोज शेअर केले असून त्यांचं छोटेपणीचं मोठं स्वप्न त्यांच्या चाहत्यांसोबत शेअर केलं आहे. सारेगमप लिटिल चॅम्प्स या कार्यक्रमाच्या स्वागताची कलाकारांची ही अनोखी पद्धत प्रेक्षकांना खूपच भावली. त्यांच्या या पोस्ट्सवर प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

येत्या 24 जूनपासून गुरुवार ते शनिवार रात्री 9.30 वाजता सारेगमप लिटिल चॅम्प्स प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

बातम्या आणखी आहेत...