आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुःखद:‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेत झळकलेला अभिनेता प्रशांत लोखंडेचे निधन, हृदयविकाराचा तीव्र झटक्याने मालवली प्राणज्योत

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ऐन उमेदीत तरुण अभिनेत्याची एक्झिट चाहत्यांनाही चटका लावून जाणारी आहे.

‘स्वराज्यरक्षक संभाजी’, ‘स्वराज्यरजननी जिजामाता’ यासारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारणारा अभिनेता प्रशांत लोखंडे याचे निधन झाले आहे. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने 14 सप्टेंबर रोजी प्रशांतची प्राणज्योत मालवली.

झी मराठी वाहिनीवरील ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ प्रशांत लोखंडे याने अब्दुला दळवी ही व्यक्तिरेखा साकारली होती. याशिवाय सोनी मराठीवरील ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या मालिकेत त्याने बाजी घोरपडे ही भूमिका साकारली होती. तर स्टार प्रवाहवरील ‘मोलकरीण बाई’ या गाजलेल्या मालिकेमध्येही तो झळकला होता.

‘स्वराज्यजननी जिजामाता’ आणि ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकांची निर्मिती करणाऱ्या ‘जगदंब क्रिएशन्स’च्या इन्स्टाग्राम पेजवर प्रशांतचा फोटो पोस्ट करत त्याला श्रद्धांजली वाहण्यात आली.

अभिनेता सिद्धार्थ जाधवने सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रशांतला श्रद्धांजली वाहिली आहे.

प्रशांतच्या अकाली निधनाने मनोरंजन विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser