आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'मराठी पाऊल पडते पुढे':... अन् सेटवर रंगला मास्क-सॅनिटायझरचा खेळ, जाणून घ्या ही भानगड आहे तरी काय

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'मराठी पाऊल पडते पुढे' चित्रपटाच्या रॅपअपवेळी अभिनेता चिराग पाटील आणि सहकलाकारांची धमाल

सध्या जेमतेम सगळ्या गोष्टी अनलॉक झाल्यामुळे आपल्या आजूबाजूला "न्यू नॉर्मल"चं दृश्य दिसत आहे. मराठी सिनेसृष्टीही हळूहळू अनलॉक होत असून महाराष्ट्रातील अनेक शूटिंग लोकेशनवर मराठी चित्रपटांचे तसेच मालिकांचे चित्रीकरण आपल्याला दिसत आहेत. मराठी कलाकारांनी अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आपल्या कामाला सुरुवात केली. आगामी मराठीचित्रपट "मराठी पाऊल पडते पुढे" याचे चित्रीकरण नुकतेच पूर्ण झाले. सिनेमाच्या टीमने अनोखा खेळ खेळत सिनेमाच्या चित्रीकरणाची सांगता केली.

सेटवरील तणावाचे वातावरण कमी करण्यासाठी फावल्या वेळेत चित्रपटचे निर्माते प्रकाश बाविस्कर यांनीहा खेळ खेळण्याचा घाट घातला. लहानपणी जसं आपण मुलांची चपळता अजून वाढावी म्हणून "आरसा - टेलीफोन" हा रंजक खेळ खेळायचो त्याचप्रमाणे निर्माते प्रकाश बाविस्करांनी "मास्क-सॅनिटायझर" हा वेगळा खेळ सेटवर खेळला. अभिनेता चिराग पाटील, जेष्ठ अभिनेते अनंत जोग, अभिनेते संजय कुलकर्णी आणि अभिनेते सतीश सलागरे या खेळात सहभागी मंडळींचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. खेळीमेळीचे वातावरण राखत या कोरोनाकाळात आपण आपल्या प्रियजनांची काळजी घ्यावी हे या खेळामागचे उद्देश होते.

मराठी माणसाने व्यवसाय क्षेत्रात उतरत आपली नवी ओळख बनवावी ही या चित्रपटाची कहाणी आहे. निर्माते प्रकाश बाविस्कर हे स्वतः यशस्वी मराठी उद्योजक असून चित्रपट निर्माते म्हणून हा त्यांचा पहिला चित्रपट आहे तसेच अकात डिस्ट्रिब्युशनचे चंद्रकांत विसपुते हे चित्रपटाचे सहनिर्माते असून स्वप्नील मयेकर हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.

भारताचे माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांचे चिरंजीव अभिनेता चिराग पाटील लवकरच '83' या बॉलिवूड चित्रपटात खुद्द क्रिकेटपटू संदीप पाटील यांची भूमिका साकारणार असून "मराठी पाऊल पडते पुढे" या चित्रपटात देखील मुख्य भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे.

बातम्या आणखी आहेत...