आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मयुरीची भावनिक नोट:लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मयुरीने पती आशुतोषच्या आठवणींना दिला उजाळा, म्हणाली - 'गेल्या वर्षी… याच दिवशी…'

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 20 जानेवारी 2016 रोजी मयुरी आणि आशुतोषचे लग्न झाले होते.

‘खुलता कळी खुलेना’ मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री मयुरी देशमुख हिने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिवंगत पती आशुतोष भाकरेच्या आठवणींना उजाळा दिला आहे. आज मयुरी आणि आशुतोष यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. या निमित्ताने मयुरीने आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे.

मयुरीने सोशल मीडियावर आशुतोषसोबतचे फोटो शेअर करुन गेल्यावर्षी आजच्या दिवशी अँडव्हेंचर स्पोर्ट्सचा आनंद लुटल्याचे सांगितले. ती लिहिले, 'गेल्या वर्षी… याच दिवशी… आपली अ‍ॅनिव्हर्सरी… नेहमीच्या रोमँटिक सेलिब्रेशनपेक्षा आपण अँडव्हेंचरस गोष्टी केल्याचा मला जास्त आनंद आहे, त्यामुळे आपण जास्त खळखळून हसलो. त्यामुळे आपण हसतानाच्या जास्त आठवणी माझ्यासोबत आहेत,' अशा शब्दांत मयुरीने आशुतोषच्या आठवणी जागवल्या आहेत.

आशुतोषने केली होती आत्महत्या
लॉकडाउनमध्ये आशुतोषने नांदेडच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. 32 वर्षीय आशुतोषने नैराश्येतून टोकाचे पाऊल उचलले होते. नांदेडमधील गणेश नगर येथील घरी मयुरी आणि आशुतोषची आई गप्पा मारत बसल्या होत्या. त्यावेळी आशुतोष वरच्या खोलीत होता. बराच वेळ झाला आशुतोष खाली आला नाही. त्यावेळी त्याचा दरवाजा ठोठावल्यानंतरही प्रतिसाद न मिळाल्याने, दुसऱ्या बाजूने खोलीत डोकावून पाहिले. त्यावेळी आशुतोष गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता. त्याला या जगाचा निरोप घेऊन आता सहा महिने लोटले आहेत.

दुःख सावरत मयुरीचे छोट्या पडद्यावर पुनरागमन
मयुरीने आता दुःख सावरत पुन्हा एकदा कामाला सुरुवात केली आहे. इमली या हिंदी मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. या मालिकेत तिच्यासह गश्मीर महाजनी महत्त्वाच्या भूमिकेत आहे.

20 जानेवारी 2016 रोजी मयुरी आणि आशुतोषचे लग्न झाले होते. आशुतोषने ‘भाकर’, ‘इच्यार ठरला पक्का’ या चित्रपटात काम केले होते. तर मयुरीने डॉ. प्रकाश बाबा आमटे, 31 दिवस आणि ग्रे यांसारख्या चित्रपटात काम केले. तसेच तिने डिअर आजो आणि तिसरे बादशाह हम या नाटकांमध्येही काम केले.

बातम्या आणखी आहेत...