आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालिकांचे एक तासाचे विशेष भाग:यश-नेहाच्या नात्यात येणार रंजक वळण, सिद्धार्थच्या खोटेपणाने दुखावणार अदिती

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ६ फेब्रुवारीला रंगणार माझी तुझी रेशीमगाठ आणि तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं मालिकांचे एक तासाचे विशेष भाग.

येत्या रविवारी म्हणजेच ६ फेब्रुवारीला झी मराठीवर 'माझी तुझी रेशीमगाठ' आणि 'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' या दोन मालिकांचे महाएपिसोड प्रसारित केले जाणार आहेत. दोन्ही मालिका सध्या रंजक वळणावर पोहोचल्या आहेत आणि मालिकेत आता पुढे काय घडणार याची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.

‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेत यशच्या अपघातानंतर नेहा यशला भेटण्यासाठी त्याच्या घरी जाते पण सिम्मी काकू तिला तिच्या गरीबीवरुन सुनावते आणि यशपासून लांब राहा सांगते. दुखावलेली नेहा यशला शंभर रुपयात दिवस काढायचं चॅलेंज देते. नेहाला जाणीव होते की कदाचित यशच्या बाबतीत आपण अतिरेक केला. पण घडलेल्या घटनांमुळे यश निर्णय घेतो की यापुढे नेहाला जबरदस्ती प्रेमाचा स्वीकार करायला लावायचा नाही. मैत्रीचा हात पुढे करण्यासाठी आलेल्या नेहाच्या हातात यश मात्र रिलिविंग लेटर देऊन सांगतो की पुढच्या चार दिवसांत ती नोकरी सोडून जाऊ शकते. यश नेहाच्या नात्यातलं हे रंजक वळण या महाएपिसोडमध्ये पाहायला मिळणारे..काय असेल यापुढे नेहाचा निर्णय हे येत्या आठवड्यात प्रेक्षकांना कळेल.

'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' मालिकेत सध्या अदिती आणि सिद्धार्थच्या संसाराच्या गाडीला सिद्धार्थच्या अमेरिकेच्या हट्टाने धक्का बसलाय. गोड गुलाबी संसाराच्या स्वप्नांमध्ये रमलेल्या अदितीला सिद्धार्थ खोटेपणाचा आधार घेऊन अमेरिकेला घेऊन जाण्याची स्वप्न रंगवतोय. एकीकडे अदिती हनीमूनला जाण्याची तयारी करतेय तर सिद्धू अमेरिकेल्या जाण्याची. रविवारच्या विशेष भागात सिद्धार्थचा खोटेपणा अदितीसमोर येणार आहे. सिद्धार्थच्या खोटेपणाने दुखावलेली अदिती सिद्धार्थसोबत अमेरिकेला जाणार की कुटुंबाची साथ देणार? अदिती समोरचा हा पेच तिला कुठे घेऊन जाणार हे पाहाणं निश्चितच रंजक ठरणार आहे.

बातम्या आणखी आहेत...