आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
झी टॉकीजच्या ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’ या पुरस्कार सोहळ्याची प्रेक्षक दरवर्षी आतुरतेने वाट पाहत असतात. यंदाही हा दैदीप्यमान पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. पण या सोहळ्याचं हे वर्ष काहीस खास असणार आहे. यंदाचा हा लोकप्रिय सोहळा ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’ सुवर्ण दशक सोहळा म्हणून साजरा करण्यात येणार आहे. आता या सोहळ्याची नामांकन यादी जाहिर करण्यात आली आहे.
‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’ सुवर्ण दशक सोहळ्यामध्ये एकूण 12 श्रेणींमध्ये पुरस्कार दिले जाणार आहेत. यामध्ये फेवरेट चित्रपट, फेवरेट दिग्दर्शक, फेवरेट अभिनेता, फेवरेट अभिनेत्री, फेवरेट सहाय्यक अभिनेता, फेवरेट सहाय्यक अभिनेत्री, फेवरेट खलनायक, फेवरेट गीत, फेवरेट गायक, फेवरेट गायिका, फेवरेट पॉप्युलर फेस, फेवरेट स्टाईल आयकॉन असे विविध पारितोषिकं वितरीत करण्यात येणार आहेत. प्रेक्षकांसाठी आपल्या लाडक्या कलाकारांना भरभरुन प्रेम देण्याची ही संधी आहे.
‘मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’, ‘मी सिंधुताई सकपाळ’, ‘काकस्पर्श’, ‘दुनियादारी’, ‘लई भारी’, ‘सैराट’, 'मुळशी पॅटर्न ', ‘हिरकणी’ यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांना फेवरटे चित्रपटासाठी नामांकने मिळाली आहेत. विशेष म्हणजे या दर्जेदार चित्रपटांमध्ये फेवरेट चित्रपटाचं विजेतेपद मिळविण्यासाठी चांगलीच स्पर्धा रंगणार आहे.
प्रत्येक चित्रपट त्या त्या चित्रपटांमधील मुख्य अभिनेता व अभिनेत्री आणि त्या चित्रपटाच्या संपूर्ण टीमच्या अथक परिश्रम आणि कामगिरीमुळे प्रेक्षकांपर्यंत पोहचतो. फेवरेट अभिनेता आणि फेवरेट अभिनेत्रीचं विजेतपद मिळवणंही कलाकारांसाठी काही सोप नसतं.
यावर्षी ‘दुनियादारी’ चित्रपटासाठी चॉकलेट हीरो स्वप्निल जोशी, ‘लई भारी’ चित्रपटामधील उत्तम अभिनयासाठी अभिनेता रितेश देशमुख, सुपरहीट ‘सैराट’ चित्रपटासाठी अभिनेता आकाश ठोसर, ‘आनंदी गोपाळ’ चित्रटासाठी ललित प्रभाकर यांसारख्या सुप्रसिद्ध अभिनेत्यांना फेवरेट अभिनेत्याचं नामांकन मिळालं आहे.
तर दुसरीकडे फेवरेट अभिनेत्रीचं विजेतेपद मिळविण्यासाठी चित्रपटसृष्टीमधील ग्लॅमरस तसेच नव्या पिढीच्या अभिनेत्रींमध्ये स्पर्धा रंगणार आहे.
‘नटरंग’ चित्रपटासाठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, ‘सैराट’ चित्रपटासाठी अभिनेत्री ‘रिंकू राजगुरु’, ‘डबलसीट’ चित्रपटासाठी अभिनेत्री मुक्ता बर्वे, ‘बकेट लिस्ट’ चित्रपटासाठी अभिनेत्री माधुरी दीक्षित, ‘दुनियादारी’ चित्रपटासाठी अभिनेत्री सई ताम्हणकर यांसारख्या अभिनेत्रींना नामांकन मिळाली आहेत.
दिग्गज कलाकारांबरोबच चित्रपटसृष्टीमधील नव्या पिढीतील कलाकारांनाही या सोहळ्यासाठी नामांकन मिळाली आहेत.
फेवरेट दिग्दर्शक, फेवरेट सहाय्यक अभिनेता, फेवरेट सहाय्यक अभिनेत्री, फेवरेट खलनायक, फेवरेट गीत, फेवरेट गायक, फेवरेट गायिका, फेवरेट पॉप्युलर फेस, फेवरेट स्टाईल आयकॉन या पुरस्कारांसाठी एका एका कलाकाराची निवड करणं प्रेक्षकांसाठी मोठा टास्क असणार आहे.
आता ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’ या सुवर्ण दशक सोहळ्यामध्ये कोणकोणते कलाकार विजेतेपद मिळवणार याकडे साऱ्यांच लक्ष लागून राहिलं आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.