आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आली समीप लग्न घटिका:मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकरच्या मेहंदी सोहळ्याचे हे फोटो पाहिलेत का तुम्ही!

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मितालीच्या हातावर लग्नाची मेहंदी सजली

मराठी चित्रपटसृष्टीतील क्यूट कपल सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर पुढच्या काही तासांतच लग्नाच्या रेशीम गाठीत अडकणार आहेत. सध्या त्यांच्या लग्नापूर्वीच विधी सुरु आहेत. ग्रहमख पूजा आणि हळद लागल्यानंतर आता मितालीच्या हातावर लग्नाची मेहंदी लागली आहे.

या मेहंदी सोहळ्याचे खास फोटो सिद्धार्थ आणि मिताली यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत.

या फोटोत मिताली आणि सिद्धार्थची क्यूट केमिस्ट्री लक्ष वेधून घेत आहे.

मितालीसुद्धा अतिशय सुंदर दिसतेय.

सिद्धार्थच्या आई सीमा चांदेकर यांनीही मेहंदी काढून घेतली आहे. सिद्धार्थने आईसोबतचा हा खास फोटो शेअर केला आहे.

दोन दिवसांपूर्वी सिद्धार्थच्या घरी ग्रहमखाचा विधी संपन्न झाला होता. त्यानंतर परवा दोघांनाही हळद लागली. सिद्धार्थने हळदीचे फोटो सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत. अरं हलद लागली... असं कॅप्शन सिद्धार्थने या फोटोला दिले आहे.

2019 मध्ये सिद्धार्थ-मितालीचा साखरपुडा पार पडला. गेल्या तीन वर्षांपासून हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत. आता हे आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात करत आहेत.