आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवी मालिका:'तुझं माझं जमतंय' या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण करतेय मोनिका बागुल, रोशन विचारे साकारतोय प्रोफेसरची भूमिका

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ही मालिका 4 नोव्हेंबर पासून झी युवा वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

'तुझं माझं जमतंय' या आगामी मालिकेच्या प्रोमोजमुळे प्रेक्षकांमध्ये मालिकेची बरीच चर्चा होतेय. या मालिकेतून अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर पुनरागमन करतेय आणि यावेळी हि ती एकदा ठसकेदार 'पम्मी' या व्यक्तिरेखेसोबत प्रेक्षकांच्या भेटीस येतेय त्यामुळे प्रेक्षक या मालिकेसाठी खूपच उत्सुक आहेत. अपूर्वा नेमळेकर सोबत या मालिकेत रोशन विचारे आणि मोनिका बागुल हे दोघे या मालिकेत प्रमुख भूमिका निभावताना दिसणार आहेत.

मोनिका या मालिकेतून टेलिव्हिजनवर पदार्पण करतेय. तिच्या पदार्पणाविषयी आणि मालिकेतील तिच्या व्यक्तिरेखेविषयी बोलताना मोनिका म्हणाली, "तुझं माझं जमतंय या मालिकेत मी अश्विनी नवले हि व्यक्तिरेखा साकारतेय. अश्विनी हि खूपच साधी, सरळ, हळवी आणि चुलबुली आहे. तिचं आयुष्य तिची आई, तिची बहीण आणि सर्वात महत्वाचं म्हणजे घरातील टीव्ही याभोवती फिरतं. टीव्हीवर लागणाऱ्या मालिकांमध्ये जे घडतं तसंच खऱ्या आयुष्यात देखील घडतं असा अश्विनीचा समज आहे. टीव्ही हा अश्विनी आणि तिच्या आईच्या जीवनातील अविभाज्य भाग आहे. पदार्पणातच मला अशी भूमिका आणि दिग्गज कलाकारांसोबत काम करायला मिळतंय याचा मला आनंद आहे आणि प्रेक्षकांना अश्विनी नक्की आवडेल अशी मला खात्री आहे."

अभिनेता रोशन विचारे साकारणार प्रोफेसरची भूमिका
अभिनेता रोशन विचारे या आधी एका पौराणिक मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आला होता आणि आता तुझं माझं जमतंय या मालिकेत तो मानसशास्त्र या विषयाच्या प्राध्यापकाची भूमिका साकारताना
दिसणार आहे. त्याच्या या नव्या भूमिकेबद्दल बोलताना रोशन म्हणाला, "प्रेक्षकांनी मला पौराणिक व्यक्तिरेखा साकारताना पाहिलं आहे. आता मला एका साध्या वेशात आणि साध्या मुलाची भूमिका
साकारताना प्रेक्षक पाहू शकतील. तुझं माझं जमतंय या मालिकेत मी माझ्या वयाच्या आसपासची भूमिका साकारतोय याचा मला खूप आनंद होतोय. या मालिकेत मी शुभंकर नगरकर नावाच्या एका
मानसशास्त्र या विषयाच्या प्राध्यापकाची व्यक्तिरेखा निभावणार आहे जो महिला विद्यालयात शिकवतो. शुभंकरला फोटोग्राफीची सुद्धा आवड आहे. शुभंकर याचं लग्न अश्विनीशी होतं, पण पम्मी त्या
दोघांच्या वैवाहिक जीवनात काय तडका लावणार आहे हे प्रेक्षकांना या मालिकेतून पाहायला मिळेल."