आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रेक्षकांची आवडती अभिनेत्री मृण्मयी देशपांडे सध्या झी मराठीवरील सा रे ग म प लिटील चॅम्प्स कार्यक्रमात सुत्रसंचालक म्हणून दिसत आहे. सा रे ग म प लिटील चॅम्प्सचं नवीन पर्व नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे आणि त्याला प्रेक्षकांकडून उस्फुर्त प्रतिसाद देखील मिळत आहे. या पर्वाच सूत्रसंचालन करण्याचा अनुभव आणि ते करत असताना सामोरं जावं लागणाऱ्या आव्हानांबद्दल मृण्मयी सोबत साधलेला हा खास संवाद...
- मी स्वतः 11 वी पर्यंत शास्त्रीय संगीत शिकली आहे. माझी आई आणि बहीण गौतमी दोघी उत्तम गातात त्यामुळे घरी संगीताचा वारसा आहे. तसेच सारेगमप या कार्यक्रमाचं मी सूत्रसंचालन करावं हे माझ्या आईच स्वप्न होतं त्यामुळे या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनासाठी मला विचारण्यात आलं तेव्हा मी लगेचच होकार दिला. मुळातच गाणं हा विषयच माझ्या खूप जवळचा आहे आणि या पर्वातील स्पर्धक खूपच उत्तम आहेत त्यामुळे मला खूप मजा येतेय.
- मला त्यांच्या सोबत काम करताना खूप मजा येतेय. हे पाचही जण खरोखर रत्न आहेत. इतक्या वर्षानंतर त्यांना ज्युरींच्या भूमीकेत बघताना मला खूप छान वाटतंय. त्यांना आपण सर्वांनीच लहानपणापासून बघितलं आहे. अजूनही त्यांना बघून माझ्यासमोर ती लहान पिल्लं समोर येतात; पण खरंच त्यांनी त्यांच्या करियरमध्ये खूप यश मिळवलं आहे. म्हणूनच त्यांना आपण पंचरत्न म्हणून ओळखतो.
- मुळातच अभिनयासाठी स्क्रिप्ट असते. अँकरिंगसाठी स्क्रिप्ट नसते. तुम्हाला त्यामध्ये खरं खरं बोलावं लागत. गाणं सादर झाल्यावर त्या गाण्याबद्दल तुम्हाला काय वाटलं हे तुम्ही त्या वेळेस डोक्यात तयार करायचं असतं. त्यामुळे इकडे स्क्रिप्टचं एवढं महत्व नसतं.
- जर तुम्ही खरे असाल तर त्यामध्ये तुम्हाला अभिनय करण्याची गरज नसते. अँकर हा माणूस म्हणून कसा आहे हे लोकांपर्यंत अँकरिंग करताना पोहोचतं. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करताना मी एक अभिनेत्री नाही तर मृण्मयी म्हणून प्रेक्षकांसमोर येतेय. त्यामुळे अभिनयाचा आव आपण त्या ठिकाणी नाही आणू शकत आणि मुळातच माझी ऍक्टिंग ही ऍक्टिंग नसते. त्या वेळेस मला जे वाटतं ते मी पडद्यावर साकारते. रिऍलिटी शोमध्ये भावना खऱ्या असतात. गाणं कानावर पडल्यानंतर त्यावर येणाऱ्या प्रतिक्रिया खऱ्या असतात. त्यामुळे यामध्ये अभिनयाला शून्य वाव आहे.
- प्रत्येक सूत्रसंचालकाने उत्स्फूर्त असणं अतिशय महत्वाचं आहे. मुळातच मोठ्या माणसांपेक्षा लहान मुलांना सांभाळणं अवघड असतं. त्यांना बोलतं करण्याचं, त्यांचा आत्मविश्वास कायम ठेवण्याचं, कधी एखाद्याच गाणं वाईट होऊ शकतं त्यावेळी त्यांना धीर देण्याचं आव्हान माझ्या समोर आहे. हे मला उत्तमरीत्या जमेल अशी आशा आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.