आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुक्ता-उमेशचे छोट्या पडद्यावर कमबॅक:मुक्ता बर्वे आणि उमेश कामतची नवी मालिका 'अजूनही बरसात आहे' लवकरच, उलगडणार मीरा आणि आदीची प्रेमकथा

13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'अजूनही बरसात आहे' ही मालिका 12 जुलैपासून सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

सोनी मराठी प्रेक्षकांसाठी नवनवीन मालिकांची मेजवानी सातत्यानी घेऊन येत असते आणि त्यात आता 'अजूनही बरसात आहे' या नव्या मालिकेची भर पडली आहे. चित्रपटसृष्टीतले लाडके चेहरे मुक्ता बर्वे आणि उमेश कामत या मालिकेत मुख्य भूमिकांत दिसणार आहेत.

मुंबई-पुणे-मुंबई, डबल सीट, जोगवा या आणि अशा अनेक दर्जेदार चित्रपटांद्वारे, सहजसुंदर अभिनयामुळे मुक्ता बर्वे महाराष्ट्राच्या घराघरांत पोचली. उमेश कामत हा तर तरुणींच्या गळ्यातला ताईतच. त्यानेही टाईम प्लिज, लग्न पाहावे करून अशा अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.

चित्रपटांबरोबरच नाटक माध्यमातूनही उमेश आणि मुक्ता प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. मुक्ता आणि उमेश यांनी 'लग्न पाहावे करून' या चित्रपटात एकत्र काम केलं आहे. तब्बल 8 वर्षांनी ही जोडी प्रेक्षकांना पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे.

एवढंच नाही तर उमेश सात वर्षांनंतर छोट्या पडद्यावर प्रेक्षकांना भेटायला येणार आहे. मालिकेच्या नावातून आणि जाहिरात पाहून ही एक प्रेमकथा आहे असं वाटतंय. थोडी खुसखुशीत आणि अनेक रंगांनी भरलेली मीरा आणि आदी यांची ही प्रेमकथा प्रेक्षकांना नक्कीच आवडेल, अशी आशा व्यक्त करुयात.

बातम्या आणखी आहेत...