आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे बंध मैत्रीचे:‘मुरांबा’ मालिकेतील रमा-रेवाचं मैत्रीचं अतुट नातं, म्हणाल्या - पडद्यावरची मैत्री खऱ्या आयुष्यातही जपतोय...

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • खऱ्या आयुष्यातही या दोघींची घट्ट मैत्री झाली आहे.

स्टार प्रवाहवर आजपासून (14 फेब्रुवारी) सुरु झालेल्या ‘मुरांबा’ मालिकेची सध्या कमालीची उत्सुकता आहे. मालिकेच्या प्रोमोजना प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत असून रमा आणि रेवाच्या मैत्रीचा बंध अनुभवण्यासाठी सारेच उत्सुक आहेत. रमा आणि रेवाच्या मैत्रीचं अतुट नातं मालिकेत पाहायला मिळेलच. मात्र खऱ्या आयुष्यातही या दोघींची घट्ट मैत्री झाली आहे. एकत्र सीन करता करता या दोघींमधला मैत्रीचा बंध आंबट गोड मुरांब्याप्रमाणेच मुरला आहे. त्यामुळेच सेटवर एकमेकांचे डबे शेअर करण्यापासून सुरु झालेली मैत्री आता आयुष्यातल्या सुख दु:खाच्या गोष्टी शेअर करण्यापर्यंत पोहोचली आहे.

मुरांबा मालिकेच्या निमित्ताने रमा आणि रेवाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री निशाणी बोरुले आणि शिवानी मुंढेकर पडद्यावरची मैत्री खऱ्या आयुष्यातही जपत आहेत.

रमाची भुमिका साकारणारी अभिनेत्री शिवानी मुंढेकर मुळची कराडची. इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलेल्या शिवानीला लहानपणापासूनच अभिनयाची आवड आहे. कॉलेजमध्येही ती वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हायची. सोशल मीडियावरही ती खूपच सक्रिय असते. मुरांबा ही तिची पहिलीच मालिका आहे. अभिनयातच करिअर करण्याचं शिवानीचं स्वप्न या मालिकेच्या निमित्ताने पूर्ण होत आहे.

तर रेवाची भुमिका साकारणाऱ्या निशाणी बोरुलेने याआधी जाहिरात विश्वात आपली छाप पाडलीय. त्याचसोबत स्टार प्रवाहच्या 'प्रेमा तुझा रंग कसा' या मालिकेतही ती झळकली होती. अभिनयासोबतच शिवानीला ट्रेकिंग आणि ट्रॅव्हलिंगचीही आवड आहे.

बातम्या आणखी आहेत...