आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

नाट्य सृष्टीला धक्का:प्रसिद्ध नाट्य निर्माते गोविंद चव्हाण यांचे निधन, उपचारादरम्यान मालवली प्राणज्योत 

मुंबई25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गोविंद चव्हाण यांच्या निधनाने नाट्य सृष्टीत शोक व्यक्त केला जात आहे.
Advertisement
Advertisement

यू टर्न, हिमालयाची सावली, मदर्स डे, दुधावरची साय यासह अनेक गाजलेल्या नाटकांची निर्मिती करणारे प्रसिद्ध नाट्य निर्माते गोविंद चव्हाण यांचे आज (13 जुलै) सकाळी ब्रेन हॅमरेजने बोरिवली येथील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. 

गोविंद चव्हाण हे बोरिवली येथे वास्तव्याला होते. प्रकृती बिघडल्याने रविवारी दुपारी त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सायंकाळी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली. मात्र आज सकाळी त्यांची तब्येत अचानक बिघडली आणि उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

'यू टर्न' हे आनंद म्हसवेकर लिखित व दिग्दर्शित त्यांचे नाटक कमालीचे गाजले होते. सध्या रंगभूमीवर त्यांची निर्मिती असलेले 'हिमालयाची सावली' हे नाटक चांगले गाजत होते. अभिनेता शरद पोंक्षे यांनी या नाटकामध्ये मुख्य भूमिका केली आहे. नाट्य विश्वातील कलाकारांनी त्यांच्या जाण्यानं हळहळ व्यक्त केली आहे. 

Advertisement
0