आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुःखद:राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपट दिग्दर्शक कांचन नायक यांचे निधन, ‘कळत नकळत' आहे गाजलेला चित्रपट 

पुणे10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • काही चित्रपटांसाठी त्यांनी सहायक दिग्दर्शक म्हणूनही काम केले.

‘कळत नकळत'  आणि ‘विश्वनाथ एक शिंपी’ या दोन्ही चित्रपटांसाठी दिग्दर्शनाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळविणारे प्रसिद्ध दिग्दर्शक कांचन नायक यांचे सोमवारी पुण्यात अल्प आजाराने निधन झाले. ते 65 वर्षांचे होते. दुपारी दोनच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. चाळीस वर्षांहून अधिक काळ नायक हे चित्रपटसृष्टीशी निगडीत होते. 

डॉ. जब्बार पटेल, राजदत्त, दिनकर पाटील आदी दिग्दर्शकांसाठी त्यांनी सहायक दिग्दर्शक म्हणूनही काम केले होते. चित्रपटांप्रमाणेच माहितीपट, लघुपट आणि मालिकांसाठीही त्यांनी काम केले होते. दणक्यावर दणका, माझी आई, घर दोघांचे, राजू, सवत माझी लाडकी, अरे संसार संसा.. हे त्यांचे चित्रपट प्रसिद्ध आहेत. काही चित्रपटांसाठी त्यांनी सहायक दिग्दर्शक म्हणूनही काम केले. 

मानवी नातेसंबंध, त्यातील ताणतणाव आणि व्यक्तींच्या जगण्यावर त्याचा होणारा परिणाम, हा कांचन नायक यांच्या दिग्दर्शकीय कारकिर्दीचा विशेष पैलू होता. त्यांनी हळुवार नातेसंबंधांप्रमाणेच सामाजिक आशयाचे, कौटुंबिक तसेच विनोदी चित्रपटही दिग्दर्शित केले.

बातम्या आणखी आहेत...