आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'नवा गडी नवा राज्य'मध्ये बाप्पाचे आगामन:सहा वर्षानंतर कर्णिकांच्या घरी श्रीगणेश होणार विराजमान, आनंदीने स्वतः साकारला गणराया

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

झी मराठी वाहिनीवरील 'नवा गडी नवं राज्य' ही मालिका लोकांच्या मनात स्थान निर्माण करत आहे. आता पर्यंतच्या भागात कर्णिकांच्या घरात आनंदी स्थिरता आणण्याचा प्रयत्न करते आहे. रमाच्या आणि आनंदीच्या कुरापतींमध्ये त्यांची एका गोष्टीवर एक वाक्यता होते आणि ती म्हणजे दोघींची गणपती बाप्पा वरची अपार श्रद्धा.

आनंदीला कळते की राघवने रमा गेल्यापासून गणपतीची स्थापना केली नाही. पण आता आनंदी ठरवते की, तिच्या स्वतःच्या आणि रमाच्या इच्छेसाठी तसेच कौटुंबिक आनंदासाठी पुन्हा गणपती बाप्पा बसवायचे. तर आता सहा वर्षानंतर बाप्पा पुन्हा एकदा कर्णिकांच्या घरी विराजमान होणार आहे.

कर्णिकांकडे अत्यंत आनंदात होणारे बाप्पाचे आगमन प्रेक्षकांना 'नवा गडी नवं राज्य' मालिकेत सोमवार ते शनिवार रात्री 9 वाजता बघता येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...