आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छोट्या पडद्यावरुन:कर्णिक निघाले लालबागच्या राजाच्या दर्शनाला, असा शूट झाला 'नवा गडी नवा राज्य'चा हा सीन

22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

"नवा गडी नवं राज्य" ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. आतापर्यंतच्या भागात आपण पाहिले की कर्णिकांच्या घरी गणेश उत्सव मोठ्या आनंदाने साजरा झाला त्यामुळे रमासहित सर्व मंडळी फारच खुश आहे. येत्या भागात प्रेक्षकांना पहायला मिळेल की चिंगीला तिच्या मित्रमैत्रिणीसोबत लालबागच्याराजाच्या दर्शनाला जायचे आहे आणि आनंदीची देखील तशी इच्छा आहे. राघव दोघींची इच्छा पूर्ण करण्यासाठी लालबाग राजाच्या दर्शनाला घेऊन जातो.

ह्या भागाच्या चित्रीकरणावेळेसचे अनुभव सांगताना मालिकेचा लेखक प्रह्लाद कुडतरकर म्हणतो, "लालबागच्या राजाचा विजय असो.." ही घोषणा करत, ऐकत गिरणगावात बालपण गेलं.. राजाचा आशीर्वाद कायम पाठीशी असायचा.. तोच आताही आहे.. त्यामुळेच लालबागच्या राजाच्या इथे मालिकेचं शुटींग ही गोष्ट कुणालाही सांगितल्यावर अशक्य वाटली.. अर्थातच भाविकांची राजाच्या दर्शनासाठी होणारी गर्दी.. त्याची सगळ्यांना असणारी ओढ.. ह्यामुळे सगळ्यांना असं वाटून गेलं.. पण लालबागच्या राजाच्या आशीर्वादाने झी मराठीवरील "नवा गडी नवं राज्य" या मालिकेचं चित्रीकरण झालं.. त्यामागे अर्थातच सगळ्या टीमची मेहनत आहे.. आणि विशेष उल्लेख करावासा वाटतो तो लालबागच्या राजा गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा.. भाऊंनी (सुधीर साळवी) दिलेलं सहकार्य खूपच महत्वाचं होत.. नवा गडी नवं राज्य मालिकेची टीम.. झी मराठीची टीम.. आणि लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ह्या सगळ्यांच्या मेहनतीने हे भाग चित्रित झाले आहेत.. राजाचा आशीर्वाद आहे.. आता तुम्ही हे भाग बघून "नवा गडी नवं राज्य " ह्या मालिकेला खूप सारं प्रेम द्याल ह्याची खात्री आहे.

'नवा गडी नवं राज्य' लालबाग विशेष भाग प्रेक्षकांना येत्या गुरुवार म्हणजे ८ सप्टेंबर रात्री 9 वाजता बघता येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...