आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'नवरी नटली' फेम गायकाचे नवीन गाणे रिलीज:'बघा माझा खंडोबा कसा डोलतो... ' गायक राहुल शिंदे यांचे खंडोबावरील नवे गाणे झाले रिलीज

16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • श्री खंडोबाच्या आख्यायिकेवर हे गाणे बेतलेले आहे.

नवरी नटली... पुण्याचा राघू... स्वर्गाची सुंदरी... अशा एकाहून एक लोकप्रिय गीतांचे गायक राहुल शिंदे यांचे श्री खंडेरायावरचे एक नवे गाणे रसिकांच्या भेटीला आले आहे. तुळजापूर तालुक्यातील अणदूर आणि नळदुर्ग येथील श्री खंडोबाच्या आख्यायिकेवर हे गाणे असून पत्रकार सुनील ढेपे यांनी ते लिहिले आहे.

अणदूर आणि नळदुर्ग येथील श्री खंडोबाची मूर्ती एकच आहे. अणदूरमध्ये सव्वादहा महिने, तर नळदुर्ग येथे पावणेदोन महिने श्री खंडोबाचे वास्तव्य असते. श्री खंडोबा आणि बाणाई यांचा विवाह या ठिकाणी झाल्याने या तीर्थक्षेत्राला विशेष महत्त्व आहे. या आख्यायिकेवर पत्रकार सुनील ढेपे यांनी लिहिलेले 'बघा माझा खंडोबा कसा डोलतो' हे भक्तिगीत गायक राहुल शिंदे यांनी आपल्या दमदार आवाजात गायले आहे. शाहीर बापू पवार आणि सचिन अवघडे यांनी या गीताला कोरस दिला आहे. मुक्तरंग म्युझिक चॅनलतर्फे हे गाणे रिलीज करण्यात आले आहे. अणदूर येथील श्री खंडोबाची यात्रा 5 डिसेंबरला आहे. ही यात्रा झाल्यावर खंडेरायाचे नळदुर्गमध्ये आगमन होते. तेथे दर रविवारी यात्रा, तर पौष पौर्णिमेला महायात्रा भरते. रविवारच्या यात्रेला राज्याच्या विविध भागांतून 20 ते 30 हजार भाविक आणि महायात्रेला सुमारे पाच लाखांवर भाविक येतात. कोरोनामुळे गेली दोन वर्षे ही यात्रा होई शकली नाही. यंदा मात्र ती पूर्वीप्रमाणे भरण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...