आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धडाकेबाज अधिकारी:रेव्हा पार्टी प्रकरणात मोठी कारवाई करणारे समीर वानखेडे 'या' प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचे आहेत पती, शाहरुख खानचा मुलगा आर्यनला घेतले ताब्यात

16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोण आहेत समीर वानखेडे?

गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या एका क्रूझ शिपमध्ये सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर एनसीबीने शनिवारी छापा टाकून कारवाई केली. या प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह आठ जणांना अटक करण्यात आली आहे. एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात ही कारवाई झाली असून यांनी आर्यन खानला ताब्यात घेतले आहे.

छापा आणि त्यानंतर केलेल्या कारवाईवर NCB अधिकारी समीर वानखेडे यांनी दैनिक भास्करला सांगितले - सध्या फक्त चौकशी सुरू आहे. तूर्तास, मी या प्रकरणात काहीही बोलणार नाही. त्यामुळे सहकार्य करा.

खास गोष्ट म्हणजे समीर वानखेडे हे मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्रीचे पती आहेत. अभिनेत्री क्रांती रेडकर हे समीर वानखेडे यांच्या पत्नीचे नाव आहे. 2017 मध्ये क्रांती आणि समीर यांचे लग्न झाले. या दाम्पत्याला जुळ्या मुली आहेत.

हे छायाचित्र क्रांती आणि समीर वानखेडे यांच्या लग्नातील आहे
हे छायाचित्र क्रांती आणि समीर वानखेडे यांच्या लग्नातील आहे

कोण आहेत समीर वानखेडे?
महाराष्ट्रात राहणारे समीर वानखेडे हे 2004 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. भारतीय पोलिस सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर डेप्युटी कस्टम कमिशनर म्हणून झाली होती. त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले.

समीर यांनी अनेक बॉलिवूड स्टार्सच्या घरी धाड टाकली आहे. त्यामध्ये विवेक ओबेरॉय, अनुराग कश्यप, रामगोपाल वर्मा अशा अनेक कलाकारांचा समावेश आहे.

मिका सिंगला घेतेले होते ताब्यात

2013 मध्ये बेकायदेशीर पद्धतीने परदेशी चलन बाळगल्याप्रकरणी प्रसिद्ध गायक मिका सिंग याला मुंबई विमानतळावरुन ताब्यात घेण्यात आले होते. ही कारवाईही समीर यांनीच केली होती 2011 मध्ये सोन्याने बनवलेल्या क्रिकेट विश्वचषक ट्रॉफीला देखील कस्टम ड्यूटी भरल्यानंतरच मुंबई विमानतळावरून बाहेर पडण्याची परवानगी दिली होती.

समीर वानखेडे हे ड्रग्जशी संबंधित प्रकरणांचा छडा लावण्यात तज्ज्ञ मानले जातात. त्यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटींच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. काही काळापूर्वीच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्ज कनेक्शन समोर आल्यानंतर त्यांनी रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्ती आणि सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा या दोघांना अटक केली होती. सुशांत मृत्यू प्रकरणातील ड्रग्ज प्रकरणाचा तपासही सध्या त्यांच्याकडे सुरु आहे.

बातम्या आणखी आहेत...