आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अचिव्हमेंट:मराठमोळ्या नेहाचा अटकेपार झेंडा, नेहा महाजन-रिकी मार्टीनच्या म्युझिक अल्बमला मिळाले ‘ग्रॅमी’ नॉमिनेशन

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नेहा महाजन आणि रिकी मार्टीन ‘Pausa’ या अल्बमला बेस्ट लॅटीन पॉप विभागामध्ये नॉमिनेशन मिळाले आहे.

मराठमोळी अभिनेत्री नेहा महाजन अभिनेत्री असण्याबरोबरच एक उत्तम सितार वादक असल्याचे आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. तिच्या याच कलेने तिने अटकेपार झेंडा रोवला आहे. नेहा आणि लॅटीन पॉप किंग रिकी मार्टीन यांच्या ‘Pausa’ या अल्बमला मानाच्या ‘ग्रॅमी’ पुरस्कारांत नॉमिनेशन मिळाले आहे. रिकीने नेहाकडून त्याच्या या अल्बमसाठी सितारची रेकॉर्ड मागवली होती.

कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याकारणाने नेहाने मुंबईतच तिच्या पद्धतीने या गाण्याच्या गरजेनुसार सितार वादनाची तयारी केली. प्रसन्ना विश्वनाथन या साऊंड रेकॉर्डिस्टच्या मदतीने तिने हे सितार वादन रेकॉर्ड करत ते रिकीपर्यंत पोहोचवले होते.

नेहा महाजन आणि रिकी मार्टीन ‘Pausa’ या अल्बमला बेस्ट लॅटीन पॉप विभागामध्ये नॉमिनेशन मिळाले आहे. या अल्बमने लॅटीन ग्रॅमीमध्येही आपले नाव गाजवले आहे. नेहाने स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

रिकीसोबतच्या या गाण्याची संधी कशी मिळाली, याविषयी एका मुलाखतीत नेहाने सांगितले, ‘जानेवारी महिन्यात रिकीकडून या गाण्यासाठीचा फोन मला आला. ज्यामध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत सितार वादन करशील का, असे मला विचारण्यात आले. मुळात रिकीला मी शाळेत असल्यापासून ऐकत होते. त्यात संगीतामध्ये रागसंगीताकडे माझा ओढा जास्त होता. त्यामुळे मी पटकन होकार दिला. या निमित्ताने काहीतरी नवे शिकण्याची संधी मला मिळाली’, असे नेहा म्हणाली.

नेहाने तिचे वडील विदुर महाजन यांच्याकडून सितार वादनाचे धडे घेतले आहेत. ती नेहमी आपले सितार वादनाचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser