आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शूटिंग अपडेट:काहीतरी शिजतंय... डॉक्टर डॉन मालिकेत नव्या कलाकाराची एंट्री

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आता हा नवीन कलाकार कोण आहे ?

छोट्या पडद्यावरील डॉक्टर डॉन या मालिकेला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळतोय. मालिकेची कथा हटके आहेच पण यातल्या कलाकारांनी आपल्या अभिनयाने या कथेला चांगला न्याय दिलाय हे महत्वाचे. म्हणूनच सोशल मीडियावरुन किंवा वैयक्तिक स्तरावरही यातल्या कलाकारांना प्रेक्षकांची पसंतीची पावती मिळतेय. डॉ. मोनिका श्रीखंडे म्हणजे प्रेक्षकांची लाडकी डॉलीबाई महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करतेय. तिचा अभिनय तसंच मालिकेतील लुक प्रेक्षकांच्या भलताच पसंतीस पडला आहे.

या मालिकेत नेहमीच काही ना काही ट्विस्ट येत असतात. पण आता या मालिकेत एक नवीन एन्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मोनिकाने देवाला स्वतःच प्रेम वाचवण्यासाठी उशीर करू नको असं सांगितलं होतं कदाचित कोणीतरी दुसरं येऊन तिला घेऊन जाईल अशी चिंता देखील ती देवासमोर व्यक्त करते. आता ही दुसरी व्यक्ती शूटिंगच्या सेटवर येऊन पोहोचली आहे पण ती कोण आहे हे श्वेताने हा फोटो सोशल मीडियावर टाकून प्रेक्षकांना ओळखायला सांगितलं आहे.

आता हा नवीन कलाकार कोण आहे आणि मालिकेत ही नवीन व्यक्तिरेखा काय वळण घेऊन येणार आहे हे प्रेक्षकांना लवकरच कळेल.

बातम्या आणखी आहेत...