आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चांगली बातमी:‘रंग माझा वेगळा’, 'वैजू नंबर 1' सह या मालिकांचे नवे एपिसोड्स 13 जुलैपासून होणार प्रसारित 

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कलाकारा मंडळीदेखील नवीन एपिसोड्सच्या चित्रीकरणासाठी उत्सुक आहे.

कोरोनाच्या संकटामुळे तीन महिन्यांपासून मालिकांचं चित्रीकरण बंद होतं त्यामुळे सर्वच वाहिन्यांवर मालिकांचं पुन:प्रक्षेपण सुरु झालं. मात्र आता हळूहळू सर्व पूर्वपदावर येत आहे. सरकारने दिलेल्या सर्व अटी-शर्थींचं पालन करुन आणि सेटवर आरोग्याची योग्य ती काळजी घेऊन स्टार प्रवाहवरील मालिकांच्या शूटिंगला सुरुवात झाली आणि आता 13 जुलैपासून नव्या भागांसह स्टार प्रवाहवरील तुमच्या आवडत्या मालिका भेटीला येणार आहेत. आपल्या आवडत्या मालिका पहाण्यासाठी प्रेक्षक जितके उत्सुक आहेत तितकीच उत्सुक आहेत कलाकार मंडळी.

‘रंग माझा वेगळा’ मालिकेत दीपाची व्यक्तिरेखा साकारणारी रेश्मा शिंदे म्हणाली, ‘आमच्या मालिकेचा पहिला एपिसोड जेव्हा ऑनएअर गेला तेव्हा मनात जेवढी धाकधूक होती तिच धाकधूक आताही आहे. कार्तिक-दीपाच्या लग्नसोहळ्यावर मालिका येऊन थांबली होती त्यामुळे यापुढील भाग खूपच उत्कंठावर्धक असतील. दीपाच्या आयुष्यात ज्याप्रमाणे नवं पर्व सुरु होत आहे त्याप्रमाणेच माझ्याही आयुष्यात नवं पर्व सुरु होत आहे. दररोज रात्री आठ वाजता ‘रंग माझा वेगळा’ मालिका लवकरच पाहायला मिळणार आहे तेव्हा प्रेक्षकांच्या भेटीसाठी मी प्रचंड उत्सुक आहे असं रेश्मा म्हणाली.

रंग माझा वेगळासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आई कुठे काय करते, वैजू नंबर 1 या मालिकांचे फ्रेश एपिसोड्स येत्या 13 जुलैपासून प्रेक्षकांना बघता येणार आहेत. 

बातम्या आणखी आहेत...