आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनाचा वाढता विळखा:कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर चित्रीकरणासाठी जाहीर झाली नवी नियमावली, निर्मात्यांना या नियमांचे करावे लागणार पालन

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • निर्माते, तंत्रज्ञ, कलावंत, कामगार व चित्रपट क्षेत्राचे विविध सेवा पुरवठादार यांच्यासाठी ही नियमावली आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने मनोरंजन क्षेत्रातील सगळ्यांसाठी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यासाठीची नियमावली नुकतीच जाहिर करण्यात आली आहे. निर्माते, तंत्रज्ञ, कलावंत, कामगार व चित्रपट क्षेत्राचे विविध सेवा पुरवठादार यांच्यासाठी ही नियमावली आहे.

  • कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढतो आहे. आपण चित्रीकरण करताना विशेष काळजी घेवूनच चित्रीकरण करावे.
  • जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासन यांची लेखी परवानगी घेवूनच चित्रीकरण करावे.
  • चित्रीकरण स्थळी जेवढी शक्य आहे तेवढी कमी टीम ठेवावी.
  • सर्वांनी सोशल डिस्ट्नसिंग पाळावे.
  • सेटवर सँनिटायझर, टेम्परेचर गन, ऑक्सिमिटर असणे आवश्यक आहे. तसेच याबाबतीत प्रत्येकाची रोज लेखी नोंद ठेवणेआवश्यक आहे.
  • आपल्या युनिट मधील कोणाचे जवळचे, शेजारी कोरोना पेशंट असतील तर संबंधित व्यक्तीची कोरोना टेस्ट करुन रिपोर्ट जवळ बाळगावा.
  • जास्त दिवस शूटिंग असेल तर सगळ्यांची कोरोना टेस्ट करुन घेणे बंधनकारक आहे.
  • शूटिंग साहित्य वरचेवर सँनिटाइज करणे आवश्यक आहे
  • तंत्रज्ञांनी, कामगार वर्गाने हँड ग्लोव्हज, फेस शिल्ड वापरावी.
  • चहापाणी, नाष्टा, लंच, स्नँक्स व डिनर यासाठी यूज अँन्ड थ्रो परंतु पर्यावरण पूरक साहित्य वापरावे. शक्यतो पँकिंग लंच वा इतर खाद्यपदार्थ वापरावेत.
  • अ.भा.म.चि.महामंडळाच्या भरारी पथकातील सदस्य पाहणी करण्याकरीता आले तर त्यांना सहकार्य करावे.
  • आपण खबरदारी घेतली तरच शूटिंग सुरळीत सुरु राहणार आहे. आपले दुर्लक्ष वा हलगर्जीपणा सरकारला शूटिंग बंदी आणण्यासाठी पूरक ठरेल.
बातम्या आणखी आहेत...