आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाचे सावट:कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर चित्रीकरणासाठी जाहीर झाली नवी नियमावली, शूटिंग सेटवर या नियमांचे करावे लागणार पालन

एका वर्षापूर्वी
 • कॉपी लिंक
 • निर्माते, तंत्रज्ञ, कलावंत, कामगार व चित्रपट क्षेत्राचे विविध सेवा पुरवठादार यांच्यासाठी ही नियमावली आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन घेतलेल्या मिटिंगमध्ये आरोग्यमंत्री राजेश टोपे, सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांच्यासह दिग्दर्शक, कलावंत यांना सहभागी करुन घेतले होते. यावेळी शूटिंग बंद केले जाणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली. सोबतच शूटिंग वेळी सर्व प्रकारची खबरदारी घेण्याची जबाबदारी सर्व निर्मात्यांनी घेतली पाहिजे व यावर विविध संघटनांनी लक्ष ठेवावे असे आवाहन त्यांनी केले आहे. त्यासाठीची नियमावली नुकतीच जाहिर करण्यात आली आहे. निर्माते, तंत्रज्ञ, कलावंत, कामगार व चित्रपट क्षेत्राचे विविध सेवा पुरवठादार यांच्यासाठी ही नियमावली आहे.

 • चित्रीकरण कमीत कमी लोकांमध्ये करावे. मॉब सीन शक्यतो टाळावेत.
 • लोकेशन निवडताना शक्यतो दाट लोकवस्तीची ठिकाणे टाळा. इनडोअर, आऊटडोअर स्टुडिओज, शहराबाहेरील रिसॉर्ट, बंगले वा तत्सम लोकेशन्स निवडा.
 • योग्य ती कायदेशीर परवानगी घेऊनच चित्रीकरण करावे.
 • शूटिंग चालू असताना लोकेशन सोडून इतरत्र भटकू नये.
 • सेट शूटिंग पूर्वी व शूटिंग नंतर सॅनिटाइज करावे.
 • सेटवर सॅनिटायझर, ऑक्सिमीटर, टेंम्परेचर गन अत्यावश्यक बाब म्हणून असावेच. प्रत्येकाची नोंद रोजचे रोज ठेवावी.
 • कलावंत सोडून इतरांनी मास्क वापरणे बंधनकारक आहे. कलावंतांनीही आपला शॉट झाला की मास्क लावणे बंधनकारक आहे.
 • वेळोवेळी ईक्विपमेंट सॅनिटाइज करावे.
 • पर्यावरण पूरक असे साहित्य चहा, नाष्टा, जेवण यासाठी वापरावे.
 • डॉक्टर सेटवर असणे आवश्यक आहे.
 • कन्टन्मेन्ट झोनमधील व्यक्तीला शूटिंगला बोलावू नये.
 • जास्तीत जास्त कामगारांना काम मिळावे म्हणून त्यांना रोटेशन पद्धतीने बोलवावे.
 • सेटवर पाहणी करण्यासाठी आलेल्या अ. भा. म. चि. म. च्या सदस्याला योग्य सहकार्य करावे.
 • लक्षात ठेवा तुमचा हलगर्जीपणा हा तुमचे चित्रीकरण बंद करण्यासाठी व लॉकडाऊनच्या दिशेने जाण्यासाठी कारणीभूत ठरु शकतो.
बातम्या आणखी आहेत...