आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ट्विस्ट अँड टर्न्स:'रंग माझा वेगळा' रोमांचक वळणावर, डॉक्टर कार्तिकचं लग्न दीपाशी होणार की श्वेताशी?

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आता ऐन मुहूर्तावेळी दीपाऐवजी श्वेता लग्नासाठी उभी रहाणार अशी परिस्थिती निर्माण झालीय.

छोट्या पडद्यावरील गाजत असलेली मालिका रंग माझा वेगळा 13 जुलैपासून रात्री 8 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि तेही नव्या ट्विस्टसोबत. मालिकेत दीपा आणि कार्तिकच्या लग्नाची धामधूम तर सुरु आहे. पण दीपा आणि दीपाची बहीण श्वेता यांच्या लग्नातल्या सेम टू सेम ड्रेसने मात्र कथानकात नवा ट्विस्ट येणार आहे.

दीपा आणि कार्तिकचं लग्न होऊ नये म्हणून सौंदर्या, श्वेता आणि राधाई यांचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. दीपाऐवजी श्वेताचं लग्न कार्तिकशी व्हावं म्हणून सौंदर्याने प्लॅनही आखलाय. यासाठी दीपा आणि श्वेताचा लग्नातला ड्रेस अगदी सारखा ठरवण्यात आलाय. आता ऐन मुहूर्तावेळी दीपाऐवजी श्वेता लग्नासाठी उभी रहाणार अशी परिस्थिती निर्माण झालीय. 

त्यामुळे कार्तिकचं लग्न नेमकं कोणाशी होणार याची उत्सुकता आहे.

0