आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'देवमाणूस' लेटेस्ट ट्रॅक:सरू आजी अंध नाही?, अजितकुमार आणणार सरू आजीचं सत्य सगळ्यांसमोर

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मालिकेला रंजक वळण

झी मराठीवरील 'देवमाणूस' या लोकप्रिय मालिकेने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला नेली आहे. एसीपी दिव्याने भर लग्नमंडपातून अजितला अटक करत, त्याला फरफटत पोलीस ठाण्याच्या दिशेने वरात काढली होती. दिव्याने अशा पद्धतीने अटक केल्याने अजित भलताच संतप्त झाला. झालेली नाचक्की आणि अपमान तो सहन करू शकला नाही. या अटकेनंतर झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी अजितच्या डोक्यात नवी समीकरण शिजू लागली आहेत.

सध्या मालिकेत डॉक्टर अजितकुमार देव याची कोर्टात केस चालू आहे आणि सरकारी वकील आर्या यांच्या विरुद्ध अजित स्वतःची केस स्वतः लढतोय. खूप चतुराईने अजित सगळ्यांची साक्ष घेऊन आपण कसे निर्दोष आहोत हे सिद्ध करण्यात कुठेतरी यशस्वी होताना दिसतोय.

या मालिकेत सुरुवातीपासून सगळ्यांना पडलेला मोठा प्रश्न म्हणजे सरू आजींना नक्की दिसतं की नाही? आता आगामी भागात अजितकुमार सरू आजींची साक्ष घेणार आहे आणि यात तो सिद्ध करणार आहे की सरू आजी अंध नसून त्यांना सर्व काही स्पष्ट दिसतं. सरू आजींना दिसतं हे सिद्ध झाल्यावर त्यांची साक्ष कोर्टात ग्राह्य धरली जाईल का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

दिव्या सिंगच्या भूमिकेत नेहा खान आहे.
दिव्या सिंगच्या भूमिकेत नेहा खान आहे.

तसंच आता मालिकेत एसीपी दिव्या सिंग हिच्या हाताखाली नवीन पोलिस अधिकारी इन्स्पेक्टर शिंदे देखील या केसमध्ये लक्ष घालणार आहेत. त्यामुळे आता एसीपी दिव्या, इन्स्पेक्टर शिंदे आणि अ‍ॅडव्होकेट आर्या हे तिघे मिळून अजितकुमारला फासावर लटकवण्यात यशस्वी होतील का हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल.

बातम्या आणखी आहेत...