आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछोट्या पडद्यावरील ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. शिकलेली मुलगी सून म्हणून नको या मताशी ठाम असणाऱ्या जीजी अक्कांसमोर कीर्तीच्या शिक्षणाचं सत्य उघड होतं. कीर्तीने इतकी मोठी गोष्ट सर्वांपासून लपवली या गोष्टीचा जीजी अक्कांना खूप त्रास होतो आणि त्या कीर्तीला घराबाहेर काढण्याचा निर्णय घेतात.
कीर्तीसाठी हा काळ खूपच कसोटीचा आहे. आई-वडिलांचं छत्र नाही. दादा-वहिनी देखील कामानिमित्ताने परदेशी. त्यामुळे कीर्ती अतिशय दु:खी आहे. खरंतर तिच्या शिक्षणाविषयी तिने जीजी अक्कांना बऱ्याचदा सांगण्याचा प्रयत्न केला. पण ते शक्य झालं नाही. त्यामुळेच जीजी अक्कांच्या रागाचा कीर्तीला सामना करावा लागतो आहे. अशा या परिस्थितीत कीर्तिला शुभमची साथ मिळणार का? हे पहाणं उत्सुकतेचं असेल.
एकमेकांची स्वप्नं समजून घेणं आणि पूर्ण करायला साथ देणं म्हणजेच खरा संसार असतो. त्यामुळे मालिकेचे यापुढील भाग अतिशय उत्कंठावर्धक असतील.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.