आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टेलिवर्ल्ड अपडेट:दीपा कार्तिकचा होणार घटस्फोट?, 'रंग माझा वेगळा' मालिकेत येणार नवा ट्विस्ट

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सासुबाईँच्या आशिर्वादानेच पुढचा प्रवास करण्याचं दीपाने ठरवलं आहे.

स्टार प्रवाहवरील ‘रंग माझा वेग’ळा मालिकेत सध्या दीपाचा कसोटीचा काळ सुरु आहे. दीपाच्या चारित्र्यावर संशय घेत कार्तिकने पितृत्व नाकारलं. स्वाभिमानी दीपाने इनामदारांचं घर सोडत एकटं राहण्याचा निर्णय घेतला. परिस्थितीसमोर हतबल न होता ती दररोज नवनवी आव्हानं स्वीकारते आहे. या कठीण काळात सौंदर्या मात्र तिच्या पाठीशी ठाम उभी राहिली आहे. सासुबाईँच्या आशिर्वादानेच पुढचा प्रवास करण्याचं दीपाने ठरवलं आहे.

सासुबाईंची खंबीर साथ असली तरी कार्तिकचा गैरसमज इतक्या टोकाला गेला आहे की त्याने आता दीपाला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या दीपावर त्याने जीवापाड प्रेम केलं त्याच दीपापासून विभक्त होण्याचं त्याने ठरवलं आहे. श्वेताच्या षडयंत्राला बळी पडत दीपापासून दूर जाण्याची वेळ कार्तिकवर आली आहे.

या सगळ्यात सौंदर्याची प्रतिक्रिया काय असेल? कार्तिकला दीपाच्या खऱ्या प्रेमाची किंमत कळणार का? दीपा या प्रसंगाचा सामना कसा करणार? हे मालिकेच्या पुढील भागांमधून उलगडेल. त्या

बातम्या आणखी आहेत...