आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाएपिसोड:'श्रीमंताघरची सून' मालिकेत रंगणार लग्नसोहळा, कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन अथर्व आणि अनन्या बांधणार लग्नगाठ

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 24 जानेवारीला 'श्रीमंताघरची सून' या मालिकेचा महाएपिसोड रंगणार आहे.

अथर्व आणि अनन्या या जोडीनी थोड्याच काळात चाहत्यांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. त्यांचा पहिल्या भेटीपासून आत्तापर्यंतचा प्रवास प्रेक्षकांना खूप आवडला. श्रीमंताघरची मुलगी आणि मध्यम घरातला मुलगा यांची हळुवार फुलत जाणारी प्रेम कहाणी या मालिकेत पाहायला मिळते आहे.

आधीच घरात असलेल्या श्रीमंताघरच्या दोन सुनांचा अनुभव घेतल्यामुळे धाकटी सून श्रीमंताघरची आणायची नाही असा निश्चय अरुणानी केला आहे. पण अथर्व ज्या अनन्याच्या प्रेमात पडला आहे, ती श्रीमंताघरची मुलगी आहे.एवढंच नाही तर ती अथर्वच्या बॉसची मुलगी आहे. अनन्याच्या आईला तिचं लग्न श्रीमंत घरात लावून द्यायचं आहे.

अथर्व आणि अनन्या यांच्या घरातल्यांनी त्यांचं लग्न ठरवलं आहे, पण त्यांना कोणीच वेगळं करू शकत नाही आणि म्हणूनच घरातल्यांचा विरोध पत्करून त्यांनी लग्न करायचा निर्णय घेतला आहे. ही दोघं कसं लग्न करतील, त्यात काय अडथळे येतील, त्यांच्या लग्नाचा स्वीकार त्यांच्या घरातले करतील का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं 24 जानेवारीच्या महाएपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...