आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्टार प्रवाहवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका अतिशय रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. आपण आईबाबा होऊ शकणार नाही ही गोष्ट लक्षात येताच जयदीप गौरीने सरोगसीद्वारे मुलाला जन्म देण्याचं ठरवलं. यासाठी मानसीने पुढाकारही दाखवला. मात्र मानसीचा खरा डाव आता गौरीला कळला आहे. गौरी आई होऊ शकत नाही असे खोटे रिपोर्ट्स मानसीने शालिनीच्या मदतीने तयार केले. गौरीसमोर हे सारं सत्य उघड झालं आहे. शालिनी आणि मानसीचं षडयंत्र गौरी जयदीपला सांगण्याचा प्रयत्न करत असताना त्याने मात्र तिचं म्हणणं ऐकून न घेता तिला उंच कड्यावरून ढकलून दिलं आहे.
गौरीवर जीवापाड प्रेम करणाऱ्या जयदीपने असा टोकाचा निर्णय का घेतला? गौरी या जीवघेण्या हल्ल्यातून बचावेल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मालिकेच्या पुढील भागांमधून उलगडणार आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.