आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं':अदितीचा हा नवा अवतार देशमुखांच्या घरात घेऊन येणार नवं वादळ, अदितीच्या वागण्यामुळे देशमुख कुटुंबीय दुखावतील का?

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सिड अदितीला तू खोटं बोललीस असं मोठ्या बाईंना सांगायला सांगतो.

एकत्र कुटुंब पद्धतीचं दर्शन घडवणारी 'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' ही मालिका प्रेक्षकांची आवडती आहे. त्यातील व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आपल्याशा वाटतात. नुकतंच मालिकेत प्रेक्षकांनी पाहिलं की, सिडचे अमेरिकेला जाण्यासाठी प्रयत्न चालू होते हे सत्य अदिती मोठ्या बाईंना सांगते आणि त्यांना जबरदस्त धक्का बसतो व त्या चक्कर येऊन पडतात. मोठ्याबाईंना चक्कर आल्याचा, धक्का बसल्याचा संपूर्ण दोष सिड व देशमुख कुटुंबातील बायका अदितीला देतात.

अदिती सिडसमोर तिने मोठ्याबाईंना तुला अमेरिकेला जायचंय असं खरं सांगितल्याचं सांगते त्यामुळे आता मालिकेत एक विलक्षण वळण येणार आहे.

सिड अदितीला तू खोटं बोललीस असं मोठ्या बाईंना सांगायला सांगतो. अदिती सारं स्वतःवर घ्यायला तयार होते. त्यासाठी मुद्दाम घरातल्यांनी तिचा तिरस्कार करावा अशी वागू लागते. देवळात जायला बायका निघतात तर अदिती वन पिस ड्रेस घालून येते आणि मुद्दाम अशा काही गोष्टी करते जेणेकरून कुटुंबियांना तिचा राग येईल.

अदितीच्या अशा वागण्यामुळे देशमुख कुटुंबीय दुखावतील का? सिड सगळ्यांना खरं सांगेल का? हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल.

बातम्या आणखी आहेत...