आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एज गॅप:अशोक सराफ यांच्यापेक्षा 18 वर्षांनी लहान आहेत निवेदिता सराफ, या 6 कपल्सच्या वयातही आहे मोठे अंतर

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जाणून घेऊया-

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ यांचा आज वाढदिवस असून त्यांनी वयाची 75 वर्षे पूर्ण केली आहे. मराठी आणि हिंदीत टीव्ही-फिल्म इंडस्ट्रीत स्वतःचा वेगळा ठसा उमटवणा-या प्रसिद्ध अभिनेत्री निवेदिता सराफ या त्यांच्या पत्नी आहेत. 27 जून 1989 रोजी अशोक आणि निवेदिता यांच्या सहजीवनाला सुरुवात झाली. यांच्या लग्नाला यावर्षी 33 वर्षे पूर्ण होणार आहेत. विशेष म्हणजे या दोघांच्या वयात तब्बल 18 वर्षांचे अंतर आहे. या दाम्पत्याला एक मुलगा असून अनिकेत हे त्याचे नाव आहे.

अशोक-निवेदिता यांच्याप्रमाणेच मराठी फिल्म इंडस्ट्रीत असे आणखी काही कपल आहेत, ज्यांच्या वयात आठ वर्षांपेक्षा अधिकचे अंतर आहे. मराठीतील क्यूट कपल उमेश कामत आणि प्रिया बापट यांच्या वयात आठ वर्षांचे अंतर आहे. तर इंडस्ट्रीतील आणखी एक जोड अशी आहे, ज्यांच्यात तब्बल 10 वर्षांचे अंतर आहे. जाणून घेऊया, मराठी इंडस्ट्रीतील असे कोणते कपल्स आहेत, ज्यांच्या वयात आहे मोठे अंतर....

बातम्या आणखी आहेत...