आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आनंदाची बातमी:कोरोनामुक्त होऊन शूटिंगवर परतल्या निवेदिता सराफ, 'अग्गंबाई सासूबाई'च्या टीमने केले जल्लोषात स्वागत; म्हणाल्या...

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • निवेदिता सराफ यांनी पुन्हा एकदा मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे.

अभिनेत्री निवेदिता जोशी-सराफ यांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यांची कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आली असून त्यांनी आता पुन्हा एकदा मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे.छोट्या पडद्यावर गाजत असलेल्या 'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेच्या सेटवर त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

या मालिकेत त्या महत्त्वाची व्यक्तिरेखा साकारत आहेत. झी मराठीच्या इंस्टाग्राम पेजवर निवेदिता सराफ यांचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. माझी टेस्ट निगेटिव्ह आली असून तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छांसाठी मी आभारी आहे, असे निवेदिता यांनी म्हटले आहे.

15 सप्टेंबर रोजी निवेदिता यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्यांना घरीच क्वारंटाइन करण्यात आले होते. त्या दिवसापासून ‘अग्गबाई सासूबाई’ मालिकेचे चित्रीकरण थांबवण्यात आले होते. त्यांचे सहकलाकार तेजश्री प्रधान, आशुतोष पत्की, डॉ. गिरीश ओक यांच्यासह इतर कलाकारांचीही कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती.

निवेदिता सराफ यांना कोरोना विषाणुची सौम्य लक्षणे जाणवू लागल्याने खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी कोरोनाची चाचणी करून घेण्याचे ठरवले होते. त्यात त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.

निवेदिता सराफ क्वारंटाइन असल्याने मालिकेच्या पुढच्या भागाचे शूटिंग थांबवण्यात आले होते. त्यामुळे 28 सप्टेंबर पासून ते 4 ऑक्टोबरदरम्यान ‘अग्गंबाई सासूबाई’चा सप्ताह विशेष भाग दाखवण्यात आले. त्यात सेटवरील कलाकार आणि तंत्रज्ञ मंडळी एकमेकांची काळजी घेऊन कसे शूटिंग करतात ते प्रेक्षकांना पाहायला मिळाले. त्याचसोबत आसावरी सेटवर असताना इतरांची कशाप्रकारे काळजी घ्यायच्या, हेदेखील मालिकेत बघायला मिळाले.

आता निवेदिता यांनी चित्रीकरणाला सुरुवात केली असून 5 ऑक्टोबरपासून मालिकेचे नवीन भाग प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत.

बातम्या आणखी आहेत...