आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या 40 वर्षांपासून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना खदखदून हसायला लावणारे तर कधी चटकन डोळ्यात पाणी आणायला लावणारे मराठी सिनेसृष्टीतील चतुरस्त्र अभिनेते म्हणजे अशोक सराफ. पडद्यावर विविधांगी भूमिका साकारणारे अशोक सराफ खासगी आयुष्यात मात्र अतिशय शांत स्वभावाचे आहे. मीडियापासूनही ते दूर राहणे पसंत करतात. खासगी आयुष्याबद्दलही ते फारसे बोलताना दिसत नाहीत. म्हणूनच अशोक मामांच्या बहीणभावंडांबद्दलची फारशी माहिती चाहत्यांना नाही. पण आता अशोक सराफ यांच्या पत्नी आणि अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक खास फोटो शेअर केला आहे. या फोटोत अशोक मामा त्यांच्या धाकट्या भावासोबत दिसत आहेत.
निवेदिता सराफ यांनी शेअर केला फोटो, म्हणाल्या - बेस्ट ब्रदर्स
अशोक सराफ यांना एक धाकटा भाऊ असून ते प्रसिद्धीच्या झोतात नाहीत. सुभाष सराफ हे अशोक मामांच्या धाकट्या भावाचे नाव आहे. सुभाष यांची चर्चा होण्याचे कारण म्हणजे निवेदितांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यात अशोक आणि सुभाष एकाच फ्रेममध्ये दिसले. निवेदिता सराफ यांनी हा फोटो शेअर करताना 'बेस्ट ब्रदर्स' असे कॅप्शन दिले आहे. नेहमीप्रमाणे अशोक मामांच्या या फोटोवरही कमेंट आणि लाइक्सचा पाऊस पडला आहे.
सीए आहेत सुभाष सराफ
अशोक यांचे धाकटे बंधू सुभाष हे व्यवसायाने सीए असून गेली मागील 40 वर्षांपासून ते मुंबईत कार्यरत आहेत. अर्थक्षेत्रात त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. अशोक मामांना त्यांच्या करिअरमध्ये त्यांच्या भावाचे मोलाचे सहकार्य मिळाले आहे. गेल्यावर्षी अशोक आणि सुभाष 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर एकत्र दिसले होते. या कार्यक्रमात दोघांनीही बऱ्याच आठवणींना उजाळा दिला होता.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.