आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वेलकम बॅक:तिसरी घंटा... पडदा उजळला... खेळ मांडला...! प्रशांत दामले म्हणाले - 'एक अल्पविराम संपला'

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आजपासून चित्रपटगृहे, नाट्यगृहे सुरू; खेळांनाही परवानगी
  • 145 दशलक्ष लोक सिनेमागृहाला पसंती देतात
  • 9000 स्क्रीन देशात यात एकल सिनेमागृहेसुद्धा
  • 600 सिनेमा हॉल्स, मल्टिप्लेक्स महाराष्ट्रात

तब्बल आठ महिने बंद असलेली चित्रपट आणि नाट्यगृहे गुरुवार (5 नोव्हेंबर) पासून उघडण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. अर्थात कोरोनामुळे शारीरिक अंतराच्या नियमानुसार चित्रपट आणि नाट्यगृहे दोन्ही 50 टक्के क्षमतेने सुरू करण्यास मुभा देण्यात आली आहे.

प्रशांत दामले म्हणाले - एक अल्पविराम संपला

प्रत्येकाचं एक टार्गेट ठरलेलं असतं ना! अभिनय करणाऱ्या नव्या लाेकांचं करिअरपासून ते निर्मात्यांच्या गणितापर्यंत आणि अगदी बॅकस्टेज आर्टिस्टच्या जगण्यातील छाेट‌्या व्यवहारापर्यंत. ते सगळंच पॉझ झालं हाेतं. तिसऱ्या-चाैथ्या लाॅकडाऊन शिथिलतेनंतर लगेचच नाटक सुरू करायला परवानगी दिली असती तर आज आपण बरंच पुढे गेलाे असताे.

चित्रपटगृहांमध्ये खाद्यपदार्थ नेण्यास बंदी

राज्याचे मुख्य सचिव संजयकुमार यांनी बुधवारी त्यासंदर्भातला आदेश जारी केला. त्यानुसार, प्रतिबंधित क्षेत्र वगळता राज्यात चित्रपटगृहे, मल्टिप्लेक्स आणि नाट्यगृहे सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, चित्रपटगृहांमध्ये खाद्यपदार्थ नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर योगवर्ग सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच बॅडमिंटन, टेनिस, स्क्वॉश आणि शूटिंग रेंज या बंदिस्त गृहातील खेळांनाही सशर्त परवानगी दिली आहे. यासंदर्भातली सुनिश्चित कार्यपद्धती लवकरच जारी करण्यात येणार आहे.

धार्मिक स्थळे बंदच
दिवाळीच्या तोंडावर सर्वधर्मीय धार्मिक स्थळे उघडली जातील अशी नागरिकांना आशा होती. मात्र दुसऱ्या लाटेच्या भीतीने सध्या प्रार्थनास्थळे कडीकुलपात ठेवण्याला आघाडी सरकारने प्राधान्य दिलेले
दिसते.