आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालिकेच्या टीमचा स्तुत्य उपक्रम:‘आई कुठे काय करते’च्या 250 भागांच्या पूर्ततेनिमित्ताने टीमने ‘आपलं घर’ संस्थेला भेट दिलं एक दिवसाचं मानधन

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या मालिकेचे दिग्दर्शक रवींद्र करमरकर यांच्या संकल्पनेतून हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला.

छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ या लोकप्रिय मालिकेचे 250 भाग नुकतेच पूर्ण झाले. यानिमित्ताने मालिकेच्या संपूर्ण टीमने या खास दिवसाचं सेलिब्रेशन अनोख्या पद्धतीने करायचं ठरवलं. ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील कलाकार, निर्माते, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञ मंडळींनी पुण्याजवळच्या ‘आपलं घर’ या संस्थेला भेट दिली. विशेष गोष्ट म्हणजे मालिकेच्या संपूर्ण टीमने आपलं एक दिवसाचं मानधन या संस्थेला भेट म्हणून दिलं.

आई कुठे काय करते मालिकेचे दिग्दर्शक रवींद्र करमरकर यांच्या संकल्पनेतून हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाविषयी सांगताना दिग्दर्शक रवींद्र करमरकर म्हणाले, ‘आपलं घर ही संस्था गेली अनेक वर्ष अनाथ मुलं आणि वृद्धांचं संगोपन करत आहे. अनेक कलाकारदेखिल या संस्थेशी जोडले गेले आहेत. याबद्दल मला माहिती होती. त्यामुळेच आई कुठे काय करतेच्या 250 भागांचं सेलिब्रेशन आम्ही आपलं घर मधील या खास परिवारासोबत करायचं ठरवलं. आमच्या संपूर्ण टीमने अख्खा दिवस या परिवारासोबत घालवला. केक कटिंग आणि धमाल करत आम्ही हा दिवस संस्मरणीय केला. या कल्पनेला सर्वांनीच होकार दिल्यामुळे हे शक्य झालं.’

‘आई कुठे काय करते’ मालिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. या प्रतिसादामुळेच 250 भागांचा टप्पा गाठणं शक्य झालं. यापुढेही मालिकेला असाच प्रतिसाद मिळत राहिल अशी आशा कलाकारांनी व्यक्त केली आहे.

बातम्या आणखी आहेत...