आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शूटिंगच्या फावल्या वेळेत कलाकारांची धमाल:'माझा होशील ना'च्या सेटवर कलाकारांनी एन्जॉय केली आमरस आणि मिसळ पार्टी

16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या खास आमरस पार्टीची क्षणचित्रं या मालिकेच्या चाहत्यांसाठी...

सध्या कोरोनच्या प्रादुर्भावामुळे राज्यात लॉकडाऊन सुरु असताना, प्रेक्षकांच्या मनोरंजनाचा वसा घेतलेल्या मालिकांचं चित्रीकरण मात्र थांबेलं नाही आहे. झी मराठीवरील प्रेक्षकांची आवडती मालिका 'माझा होशील ना'चं शूटिंग सध्या सिल्व्हासामध्ये चालू आहे.

जवळपास एका महिन्याच्या वर हे सर्व कलाकार आपल्या कुटुंबापासून दूर राहून तिकडे चित्रीकरण करत आहेत. जरी कुटुंबापासून दूर असले तरी मालिकेतील सर्व कलाकार आणि तंत्रज्ञ कुटुंबाप्रमाणेच एकमेकांची काळजी घेत आहे आणि तितकीच धमाल देखील करत आहेत.

नुकतंच या मालिकेच्या सेटवर संपूर्ण टीमने आमरस आणि मिसळ पार्टी केली. घरापासून दूर असल्यामुळे मनसोक्त आंबे खाण्याची संधी हुकली असं होऊ नये म्हणून सेटवरच या टीमने आमरसचा मनमुराद आस्वाद घेतला आणि भरपूर आंबे देखील खाल्ले.

सेटवर आमरसचा बेत असल्यामुळे सर्वांच्या तोंडाला पाणी तर सुटलंचं पण जिभेवरचा ताबा देखील सुटला आणि संपूर्ण टीमने काही मिनिटातच या आमरसचा फडशा पडला. तसंच गोड आमरस सोबतच या सर्वांनी झणझणीत मिसळचा देखील आनंद लुटला.

सोबतच मालिकेत सईची भूमिका वठवणारी अभिनेत्री गौतमी देशपांडे हिने सेटवर क्रिकेट खेळण्याचाही आनंद लुटला आहे.

बातम्या आणखी आहेत...