आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'मस्त मजेदार किचन कल्लाकार':किचन कल्लाकारच्या सेटवर पंकजा मुंडे, रोहित पवार आणि प्रणिती शिंदेंची हजेरी, शेफ मधुरा देणार टिप्स

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'मस्त मजेदार किचन कल्लाकार'चे हे खास भाग येत्या 5 आणि 6 जानेवारीला प्रेक्षकांना बघता येणार आहेत.

झी मराठीवर 'किचन कल्लाकार' हा नवीन कुकरी शो प्रेक्षकांच्या भेटीस आला आणि अल्पावधीतच प्रेक्षकांची वाहवा मिळवली. यामध्ये संकर्षण म्हणताना दिसतोय की, आता भल्या भल्या कलाकारांची शिट्टी वाजणार आणि मनोरंजनाची चव वाढणार. यावरून तर असंच दिसत की, या किचनमध्ये भल्या भल्यांचा कस लागणार आहे.

या कार्यक्रमाच्या आगामी भागात पंकजा मुंडे, रोहित पवार आणि प्रणिती शिंदे या नेते मंडळींनी या सेटवर हजेरी लावली यात महाराज म्हणजेच प्रशांत दामले यांनी या तिन्ही नेत्यांना महाराजांच्या आवडीचे पदार्थ करायचं आव्हान दिलं आणि सुरु झाली एक स्पर्धा, पण महाराजांच्या आवडीचे हे पदार्थ तयार करत असताना या मंडळींना अनेक दिव्यातून जावं लागणार.

विसरलेले पदार्थ पेठेतून आणण्यासाठी काही ठिकाणी युती तर काहीवेळा खुर्चीसाठी सामना करावा लागणार आहे. या भागात एक विसरलेला सामान मिळवण्यासाठी एक अनोखा संगीतखुर्चीचा सामना देखील रंगला. या तिघांनी सुद्धा मस्त मजेदार किस्से या भागात सांगितले.

पंकजा मुंडे यांची गटारी अमावास्येला काय फजिती झाली? प्रणिती शिंदे यांनी पायलट सारखी घोषणा कशी केली? रोहित पवार यांनी संगीतखुर्चीच्या खेळात खुर्चीचा त्यात केला आणि मग काय गुगली टाकली? हे जाणून घेण्यासाठी हा रंजक भाग चुकवू नका.

मस्त मजेदार किचन कल्लाकार या कार्यक्रमाच्या आगामी भागात शेफ म्हणून मधुरा कलाकारांना टिप्स देणार आहे. या आठवड्यातील 2 भागांमध्ये शेफची भूमिका मधुरा निभावणार आहे.

मधुराच्या टिप्स अनेक गृहिणी फॉलो करतात. आता तिच्या याच टिप्स सेलिब्रिटींना किती उपयोगी येतात ये पाहणं रंजक ठरेल.

या आठवड्यात मधुरा पंकजा मुंडे, रोहित पवार आणि प्रणिती शिंदे यांच्या पाक-कलेच्या परीक्षेत कशी मदत करते हे प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

बातम्या आणखी आहेत...