आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेत शुभमने स्वीकारलं नवं आव्हान:जागतिक दर्जाच्या ‘इंडियाज बेस्ट कूक’ पाककला स्पर्धेत भाग घेण्यासाठी शुभमला मिळणार कीर्तीची साथ

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शुभमचं नाव जगभरात व्हावं हेच स्वप्न उराशी बाळगून कीर्ती हा सारा खटाटोप करते आहे.

स्टार प्रवाहवरील ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेत लवकरच एक चुरशीची स्पर्धा पाहायला मिळणार आहे. शुभम उत्तम शेफ आहे हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. शिर्डीमध्ये त्याने बनवलेल्या मिठाईला खास मागणी असते. ज्या शिर्डी शहराला शुभमच्या हातच्या चवीने वर्षानुवर्ष मोहित केलं तीच चव आता जगाला मोहित करण्यासाठी सज्ज होतेय.

जागतिक दर्जाच्या ‘इंडियाज बेस्ट कूक’ या पाककला स्पर्धेमध्ये शुभमने भाग घ्यावा यासाठी कीर्तीने कंबर कसली. या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी जीजी अक्कांचा सुरुवातीला नकार होता. शुभमही मनापासून राजी नव्हता. मात्र कीर्तीने जीजी अक्का आणि शुभमला या स्पर्धेचं महत्त्व पटवून दिलं. शुभमचं नाव जगभरात व्हावं हेच स्वप्न उराशी बाळगून कीर्ती हा सारा खटाटोप करते आहे.

आता शुभम या स्पर्धेत सहभागी झाला आहे. तो या पाककला स्पर्धेसाठी कशी तयारी करणार आणि या स्पर्धेत तो आपली चमक दाखवणार का हे मालिकेच्या पुढील भागांमधून पाहायला मिळेल.

बातम्या आणखी आहेत...