आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निर्माता-लेखक काळाच्या पडद्याआड:'सविता दामोदर परांजपे', 'तिन्ही सांज' यासारख्या नाटकांचे लेखक शेखर ताम्हाणे यांचे निधन, 10 दिवसांपूर्वीच पत्नीचाही झाला होता  कोरोनाने मृत्यू

9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अभिनेते राजन ताम्हाणे यांचे ते ज्येष्ठ बंधू होते.

'सविता दामोदर परांजपे', 'तू फक्त हो म्हण', 'तिन्ही सांज', 'वेलकम जिंदगी' अशा नाटकांचे लेखक शेखर ताम्हाणे यांचे बुधवारी रात्री निधन झाले. ते 68 वर्षांचे होते. ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी आणि जावई असा परिवार आहे.

नाट्य दिग्दर्शक आणि अभिनेते राजन ताम्हाणे यांचे ते ज्येष्ठ बंधू होते. कोरोनामुळे ताम्हाणे यांचे निधन झाले असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. दहा दिवसांपूर्वीच म्हणजे 19 एप्रिल रोजी शेखर ताम्हाणे यांच्या पत्नी उमा यांचेही कोरोनामुळे निधन झाले होते.

शेखर ताम्हाणे यांचे 'सविता दामोदर परांजपे' हे नाटक खूप लोकप्रिय ठरले. या नाटकावर आधारित त्याच नावाचा चित्रपटदेखील आला होता. शेखर ताम्हाणे यांनी नाटकांबरोबरच अनेक एकांकिकादेखील लिहिल्या होत्या.

शेखर ताम्हाणे यांच्या निधनाने मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. ताम्हाणे यांच्या निधनामुळे मराठी नाट्यसृष्टीला कायम मार्गदर्शकाची उणीव भासेल, अशा शब्दांत प्रदीप कबरे यांनी शोक व्यक्त केला आहे. अभिनेत्री आदिती सारंगधर हिनेदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून ताम्हाणे यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

बातम्या आणखी आहेत...