आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
स्टार प्रवाहवर 22 फेब्रुवारीपासून सायंकाळी 6.30 वाजता भेटीला येणाऱ्या 'स्वाभिमान' या मालिकेत अभिनेत्री पूजा बिरारी पल्लवी ही व्यक्तिरेखा साकारत आहे. याच निमित्ताने पल्लवीशी साधलेला हा खास संवाद
पल्लवी शिर्सेकर ही व्यक्तिरेखा मी साकरते आहे. दापोलीसारख्या छोट्याशा गावात ती आपल्या कुटुंबासोबत रहाते. अशा या सर्वसामान्य कुटुंबात वाढलेल्या पल्लवीची स्वप्न मात्र मोठी आहेत. खूप शिकून प्रोफेसर होण्याचं तिचं स्वप्न आहे. तिचे निर्णय ती ठामपणे घेते. करिअर पूर्ण करण्याच्या तिच्या या ध्येयात तिला घरच्यांची साथ मिळते का हे मालिकेतून उलगडेल. स्वाभिमान ही मालिका ध्येयवेड्या पल्लवीच्या स्वप्नांचा प्रवास आहे.
माझ्या घरातून मला पुर्णपणे पाठिंबा आहे. माझं शिक्षण कॉम्प्युटर सायन्समधून घेतलं आहे. पण अभिनयाची आवड असल्यामुळे मी अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचं ठरवलं. मी माझ्या आई-बाबांना जेव्हा याविषयी सांगितलं तेव्हा त्यांनी माझ्यावर पूर्णपणे विश्वात ठेवत मला या क्षेत्रात पाऊल ठेवण्याचं बळ दिलं. पल्लवी या व्यक्तिरेखेविषयी सांगायचं तर तिच्या आईचा तिला खंबीर पाठिंबा आहे. बाबा पूर्णपणे विरोधात नाहीत. मात्र लग्नानंतरही शिक्षण घेता येतं असं त्यांचं मत आहे. त्यामुळे पल्लवी ही व्यक्तिरेखा साकारणं माझ्यासाठी नवं आव्हान असणार आहे.
खूप छान प्रतिक्रिया मिळत आहेत. प्रोमोमध्ये समुद्र किनाऱ्यावर मी सायकल चालवली आहे. मला माझ्या बाबांनी लहानपणी सायकल चालवायला शिकवली होती. त्याचा उपयोग मला मालिकेसाठी झाला. खूप छान अनुभव होता. मालिकेत कलाकारांची तगडी स्टारकास्ट आहे. स्टार प्रवाहसारखी नंबर वन वाहिनी आणि फ्रेम्स प्रोडक्शन्स सारखं उत्तम प्रोडक्शन हाऊस हा सुवर्णयोग जुळून आला आहे. स्वाभिमान मालिकेतला माझा लूकही खूप छान आहे. प्रत्येक कलाकाराचं ड्रीमरोलचं एक स्वप्न असतं. माझ्यासाठी पल्लवी ही व्यक्तिरेखा म्हणजे माझा ड्रीम रोलच आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.