आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्पर्धक ते परीक्षक:'बुगी वुगी' स्पर्धक ते 'महाराष्ट्राज बेस्ट डान्सर'चे परीक्षक, असा आहे पूजा सावंत आणि धर्मेश यांचा प्रवास

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'महाराष्ट्राज बेस्ट डान्सर' 30 नोव्हेंबरपासून, सोम आणि मंगळ रात्री 9 वा. सोनी मराठी वाहिनीवर प्रसारित होणार आहे.

'महाराष्ट्राज बेस्ट डान्सर' हा डान्स रिअ‍ॅलिटी शो लवकरच छोट्या पडद्यावर दाखल होतोय. या शोमध्ये महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यांतून आपली कला सादर करायला अनेक डान्सर्स आले आहेत आणि त्यातून परीक्षक बेस्ट डान्सर निवडणार आहेत. विशेष म्हणजे या स्पर्धेचं परीक्षण धर्मेश सर आणि पूजा सावंत करणार आहेत.

नृत्यविश्वातलं एक प्रख्यात नाव म्हणजे 'धर्मेश सर'. आपल्या नृत्यानं धर्मेश एका रिअ‍ॅलिटी शोमधून प्रसिद्ध झाला आणि त्यानंतर त्यानं पुन्हा कधी मागं वळून पाहिलं नाही. चित्रपट, डान्स शोज करतकरत आज 'धर्मेश सर' नृत्यक्षेत्रात यशाच्या आणि प्रसिद्धीच्या उंच शिखरावर पोचला आहे.

सिनेसृष्टीतील ग्लॅमरस चेहरा म्हणजे पूजा सावंत. पूजा एका रिअ‍ॅलिटी शोमधून आपल्या नृत्यानं प्रसिद्ध झाली आणि त्यानंतर तिनं पुन्हा कधी मागे वळून पाहिलं नाही. मराठी आणि हिंदी चित्रपट करत पूजा यशाच्या आणि प्रसिद्धीच्या उंच शिखरावर पोचली आहे.

फार कमी लोकांना माहीत असेल की, सोनी वाहिनीवर झालेल्या बुगी वुगी या कार्यक्रमात 2008 साली पूजा सावंत आणि धर्मेश सर यांनी भाग घेतला होता. धर्मेश सर त्या पर्वाचा विजेताही होता. पूजा आणि धर्मेश सर यांनी आपल्या प्रवासाची सुरुवात एकत्र केली आहे. बुगी वुगीच्या टॉप 5 मध्ये पूजा आणि धर्मेश सर दोघंही होते. आज एका तपानंतर दोघंही यशाच्या शिखरावर पोचले आहेत.

एका रिअ‍ॅलिटी शोमधले स्पर्धक ते 'महाराष्ट्राज बेस्ट डान्सर' या कार्यक्रमाचे परीक्षक हा प्रवास या दोघांनी एकत्र केला आहे. त्यांनी आपल्या आयुष्यात आलेले चान्स घेतले आणि आज इथपर्यंत पोचले.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser