आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मालिकेला वादाची किनार:प्राजक्ता गायकवाडने पूर्वसूचना न देता एका दिवसात मालिका सोडली, आता 'आई माझी काळुबाई' मालिकेत वीणा जगताप आर्याच्या भूमिकेत

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ही मालिका आणि प्राजक्ता यांच्यात वारंवार होणाऱ्या वादाचं पर्यवसान तिने मालिका सोडण्यात झाले आहे.

सध्या मराठी मालिका विश्वात विशेष चर्चा आहे, ती सोनी मराठीवरच्या ‘आई माझी काळुबाई’ या मालिकेतल्या ‘आर्या’या व्यक्तिरेखेची. या भूमिकेत आता लोकप्रिय अभिनेत्री वीणा जगताप दिसणार आहे. यापूर्वी ही भूमिका अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड साकारत होती. मात्र प्राजक्ताच्या वर्तणुकीचा फटका मालिकेच्या निर्मात्या आणि अभिनेत्री अलका कुबल यांना बसू लागला. कोणतीही पूर्वसूचना न देता प्राजक्ताने एका दिवसात मालिका सोडली. प्राजक्ताची जागा आता वीणा जगताप घेणार आहे.

  • काय आहे प्रकरण?

'आई माझी काळूबाई' या मालिकेतल्या आर्या या मुख्य भूमिकेसाठी प्राजक्ताची निवड झाली. पण तीन महिने उलटताच प्राजक्ताच्या वर्तणुकीचा फटका मालिकेच्या निर्मात्या आणि अभिनेत्री अलका कुबल यांना बसू लागला. ही मालिका आणि प्राजक्ता यांच्यात वारंवार होणाऱ्या वादाचं पर्यवसान तिने मालिका सोडण्यात झाले आहे.

याबद्दल बोलताना मालिकेच्या निर्मात्या अलका कुबल म्हणाल्या, "गेल्या तीन महिन्यांपासून संपूर्ण युनिट सातत्याने तिच्या आडमुठ्या वागण्याला सहन करत होतं. आजवर तिच्याकडे दुर्लक्ष केले जात होते. तिच्या खोलीत गेल्यानंतर चार-चार तास बाहेर न येणे. सीन लागून सर्व कलाकार तयार असूनही सर्वांना वाट बघायला लावणे आणि चित्रीकरणासाठी तारीख देऊनही बाहेरच्या कार्यक्रमांना हजेरी लावणे. याला सुपारी म्हटले जाते. वारंवार हे प्रकार होऊ लागल्यामुळे चित्रीकरणाचे नियोजन गडबडून जायचे. सेटवर शरद पोंक्षे, संग्राम साळवी, अनिकेत केळकर आदी अनेक कलाकार आहेत. यापैकी कुणालाही तुम्ही याबद्दल विचारु शकता. सेटवरच्याच एक ज्येष्ठ कलाकारानेही मला तिच्याबद्दल सुरुवातीला ताकीद दिली होती, तरीही मी तिच्यावर विश्वास दाखवला पण तिने आपल्या वर्तनाने सगळ्यांनाच निराश केले आहे. '

  • रंजक वळणावर मालिका

सध्या ही मालिका रंजक वळणावर आहे. स्वप्नात दिसणार्‍या गोष्टींचा शोध घेताना, त्या प्रत्यक्षात असल्याचा साक्षात्कार आर्याला झाला आणि या शोधमोहिमेत त्या गोष्टींचा तिच्या भूतकाळाशी काहीतरी सबंध आहे, हे कळेपर्यंत तिच्या भावाचं अपहरण झालं आणि त्याच्या सुटकेसाठी अपहरणकर्त्या तालेवार पाटील कुटुंबाच्या नजरकैदेत ती सून म्हणून अडकली.

खलनायक विराटच्या कह्यात असलेलं पाटील कुटुंब आणि काळुबाईवरच्या श्रद्धा-भक्तीनी त्यांच्यासमोर उभी ठाकलेली आर्या आणि वेळोवेळी तिला वाचवणारा, पण पाटलांचा वंश असलेला अमोघ; अशा रंजक टप्प्यावर ही मालिका आता आहे. ज्या घरात देवीचं नाव उच्चारायला बंदी आहे, त्या घरात देवीची पूजा होऊ घातली आहे आणि आर्याच्या भूमिकेतली वीणा जगताप सत्य आणि असत्य यांच्यातल्या लढाईची मुहूर्तमेढ पाटील घरात रोवणार आहे. ह्या कथेचा नवा उत्कंठावर्धक टप्पा आहे. प्राजक्ताच्या जागी येणाऱ्या वीणाने यापूर्वी 'राधा प्रेम रंगी रंगली' या मालिकेतून लोकप्रियता मिळवली होती. त्यानंतर 'मराठी बिग बॉस'मुळेही ती चर्चेत होती.