आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्रेंडशिप डे स्पेशल साँग:प्रार्थना बेहेरेने फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने लाँच केले ‘आपली यारी’ गाणे, अवघ्या 12 तासांत 1 मिलियन व्ह्युज मिळालेले ठरले पहिले मराठी गाणे

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सर्वात कमी वेळात 1 मिलियन व्ह्यूज क्रॉस केलेले हे पहिले मराठी गाणे बनले आहे.

नादखुळा म्युझिक लेबलच्या 'आपली यारी' गाण्याने विक्रम केला आहे. या गाण्याला निव्वळ 12 तासांमध्येच 1 मिलियन व्ह्युज मिळाले. मराठी इंडस्ट्रीतला मिलियनियर म्युझिक डायरेक्टर अशी ओळख असलेल्या प्रशांत नाकतीच्या नावावर अजून एक विक्रम नोंदवला गेला आहे.

अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने गुरूवारी 'आपली यारी' हे गाणे सोशल मीडियाव्दारे लाँच केले. बॉलिव़ूड निर्माता निखील नमीत आणि प्रार्थना बेहेरे गेले दहा वर्षापासून जवळचे मित्र आहेत. आपल्या मैत्रीच्या दशकपूर्ती निमित्ताने प्रार्थनाने निखील नमीतचे हे गाणे नुकतेच सोशल मीडियाव्दारे रिलीज केले. फ्रेंडशिप डेच्या मुहूर्तावर आलेल्या या गाण्यामध्ये पहिल्यांदाच दहा मराठी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर दिसत आहेत.

अभिनेत्री प्रार्थना बेहेरे म्हणाली, “नादखुळा या निखीलच्या म्युझिक लेबलवर फ्रेंडशिप डे निमीत्ताने आपली यारी हे गाणे लाँच होतंय. आणि ते मला लाँच करायची संधी मिळाली, याचा मला आनंद आहे. निखीलची आणि माझी मैत्री खूप जूनी आहे. त्यामुळे आमच्या दोस्तीच्या दशकपूर्तीला फ्रेंडशीपवरचेच गाणे मी लाँच करावे, हा दुग्धशर्करा योग आहे.”

निर्माता निखील नमीत म्हणतात,”आपली यारी गाण्याप्रमाणेच प्रार्थनाची आणि माझी मैत्री पक्की आणि ‘जगात लय भारी’ अशी आहे. त्यामुळेच तिने हे गाणे लाँच करणे माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. महाराष्ट्रातल्या सध्याच्या पूरपरिस्थितीमूळे आम्ही या गाण्याचा रिलीजचा सोहळा रद्द करून ते पैसे पूरग्रस्तांच्या मदतनिधीसाठी देतोय. 12 तासांत गाण्याने 1 मिलियनचा टप्पा गाठावा, याचे पूर्ण श्रेय प्रशांतच्या सुरेल संगीताला जाते. ”

'आपली यारी' गाण्याचे गीत-संगीत प्रशांत नाकतीने केले आहे. तर आदर्श शिंदे आणि सोनाली सोनावणेने हे गाणे गायले आहे. पहिल्यांदाच मराठीमध्ये निक शिंदे, श्रध्दा पवार, बॉब हातनोलकर, कोमल खरात, रितेश कांबळे, तृप्ती राणे, तन्मय पाटेकर, प्रतिभा जोशी, प्रथमेश देवळेकर, प्रतिक्षा थोरात हे दहा सोशल मीडियाइन्फ्लूएन्सर्स एका गाण्यासाठी एकत्र आले आहेत.

बातम्या आणखी आहेत...