आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा'बिग बॉस मराठी 4' हा शो आता अंतिम टप्प्याकडे वाटचाल करतोय. येत्या 8 जानेवारी रोजी या शोचा महाअंतिम सोहळा रंगणार आहे. तत्पूर्वी या शोचे आणखी एक एलिमिनेशन पार पडले. चाहत्यांचा सर्वाधिक लाडका असलेला प्रसाद जवादे या आठवड्यात घराबाहेर पडला आहे. ‘बिग बॉस’मध्ये अपूर्वा नेमळेकर, राखी सावंत, अमृता धोंगडे, किरण माने, प्रसाद जवादे, अक्षय केळकर, आरोह वेलणकर हे सदस्य उरले आहेत. नुकतंच त्या सदस्यांमध्ये एलिमेनेशन कार्य पार पडले. यात बॉटम 3 मध्ये राखी, अमृता आणि प्रसाद हे स्पर्धक होते. त्यातून या आठवड्यात प्रसाद जवादेची बिग बॉसमधून एग्झिट झाली.
प्रसादने पहिल्या दिवसापासूनच त्याच्या खेळाने आणि घरातील त्याच्या वागणुकीमुळे सर्वांचे लक्ष स्वतःकडे वेधून घेतले होते. तो एलिमिनेट झाल्याने सर्वच स्पर्धकांना दुःख झाले. आपल्याला घराबाहेर पडावे लागतंय ते ऐकून प्रसादचेही डोळे पाणावले. सगळ्या स्पर्धकांनी भावूक होत प्रसादला निरोप दिला. तर घराबाहेर जाताना प्रसादने सर्व स्पर्धकांची माफी मागून "आपली जी भांडणे आहेत ती आपण याच घरापुरती ठेवूया," असे म्हटले. त्यानंतर त्याने इन्स्टाग्रावर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांचे आभार मानले.
प्रसादने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले, "अजूनही विश्वास बसत नाहीये की बिग बॉस मराठी सिझन 4 चा माझा प्रवास संपला. खेळाच्या अंतिम टप्प्यावर येऊन बाहेर पडलो ह्याच खूप दुःख आहे पण मला एक गोष्ट खात्रीपूर्वक माहीत आहे की सलग 8 आठवडे नॉमिनेटेड असताना सतत साथ आणि वोट्स देणाऱ्या माझ्या पलटणच्या प्रेमाची पॉवर इतकी आहे की वोट्स काय, सारं जग जिंकता येईल. घरातील प्रवासात खूप उतार चढाव होते पण तुमच्या प्रेमामुळे सतत एक उमेद आणि ऊर्जा मिळत होती. तुमच्या सर्वांचा कायम आभारी असेन."
या आठवड्याच्या मध्यात आणखी एक स्पर्धक घराबाहेर जाणार आहे. तर नुकतंच अपूर्वाला तिकिट टू फिनाले मिळाल्यामुळे बिग बॉस 4ची फायनलिस्ट म्हणून तिचे नाव निश्चित झाले आहे. त्यामुळे आता फिनालेमध्ये पोहोचण्यासाठीराखी सावंत, अमृता धोंगडे, किरण माने, अक्षय केळकर, आरोह वेलणकर यांच्यात चुरस रंगलेली पाहायला मिळणार आहे. चाहत्यांमध्ये नाराजीचा सूर प्रसाद घराबाहेर पडल्याने चाहत्यांमध्ये मात्र नाराजीचा सूर आहे. जे ती ट्रॉफी जिंकायला लायक आहेत त्यांना तर तुम्ही आधीच घराबाहेर काढलंय. आता कुणीही जिंकले तरी आम्हाला फरक पडत नाही अशा प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत. अपूर्वा नेमळेकर हिने या सिझनचे पहिले तिकीट टू फिनाले मिळवले आहे. आता पुढे जाण्यासाठी अक्षय केळकर, राखी सावंत, किरण माने, आरोह वेलणकर आणि अमृता धोंगडे यांच्यात चुरस पाहायला मिळत आहे. मात्र प्रसादचे चाहते आता बिग बॉसच्या निर्मात्यांवर भडकले आहेत. आता विजेत्यांची ट्रॉफी नक्की कोणाच्या हातात जाणार हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.